Mla Sanip Kshirsagar, Beed Sarkarnama
मराठवाडा

राजकारणी `पुष्पा`च्या प्रेमात; आमदार संदीप क्षीरसागरही म्हणाले, मै झुकेंगा नही...

आयाबहिणीची, युवकांची साथ आणि थोरामोठ्यांचे आशिर्वाद पाठीशी आहेत. त्यामुळे मी कोणाला घाबरत नाही. ( Mla Sanip Kshirsagar)

सरकारनामा ब्युरो

बीड : राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने सध्या शहरात विकासकामांचे उद्घाटन, भूमीपूजन आणि लोकार्पण सोहळ्याचा धडाका सुरू आहे. बीडमध्ये (Beed) क्षीरसागर काका-पुतण्यामधील राजकीय संघर्ष अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. (Ncp) यातच काल झालेल्या एका जाहीर सभेत आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांनी सध्या गाजत असलेल्या पुष्पा चित्रपटातील `मै झुकेंगा नही`, हा डायलाॅग म्हणत विरोधकांना इशारा दिला.

पुष्पा चित्रपटातील या एका डायलाॅगने तरुणाईलाच नाहीतर राजकारण्यांना देखील मोहिनी घातली आहे. शिवेसना नेते संजय राऊत यांच्यापासून ते संदीप क्षीरसागर यांच्यापर्यंत सगळेच या डायलाॅगचा आधार घेत विरोधकांना इशारे देत आहेत. बीडमधील एका सभेत बोलतांना क्षीरसागर म्हणाले, आपण विधानसभा निवडणुकीत विरोधकांना पाणी पाजले, ही तर नगरपरिषदेची निवडणूक आहे.

समोर बसलेल्या आयाबहिणींचे आशिर्वाद आणि तुमच्या सारखे कार्यकर्ते सोबत असल्यानंतर मला कशाची भिती नाही. नुकताच मी पुष्पा चित्रपट पाहिला. तस मला पिक्चर पहायला वेळ मिळत नाही, पण औरंगाबादला काही कामा निमित्त गेलो, वेळ होता तेव्हा पुष्पा पहायला गेलो. आज मला त्या हिरोसारखा डायलाॅग मारावासा वाटतो.

मला विरोधकांना सांगायचे की मै झुकेंगा नही. त्यांच्या या वाक्यावर उपस्थितांनी एकच जल्लोष करत टाळ्या आणि शिट्या वाजवत भरभरून दाद दिली. आपल्या विरोधात सगळे एकत्र आलेत, पण आपल्याला त्याची भीती नाही. आयाबहिणीची, युवकांची साथ आणि थोरामोठ्यांचे आशिर्वाद पाठीशी आहेत. त्यामुळे मी कोणाला घाबरत नाही, असेही क्षीरसागर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT