Pradip Naik, Joytiba khrate Sarkarnama
मराठवाडा

Pradip Naik : राष्ट्रवादीचे माजी आमदार नाईक अन् ठाकरे गटाचे नेते ज्योतिबा खराटेंची बुलेट राइड

Nanded Political News : राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रदीप नाईक, शिवसेना ठाकरे गटाचे नेते ज्योतिबा खराटे यांच्या बुलेट सफारी राजकीय चर्चेचा विषय झाली आहे.

सरकारनामा ब्युरो

साजीद खान

Political News : आगामी काळात लवकरच लोकसभा व विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रदीप नाईक आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे किनवट माहूर मतदारसंघाचे विधानसभा प्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या राजकीय मैत्रीची बुलेट सफारी चांगलीच चर्चेत आली आहे.

ओ साथी साथ चल तू....मुझे लेके साथ चल तू.... यू ही दिन रात चल तू.... असे म्हणत प्रदीप नाईक यांच्या मागे बुलेटवर बसून सावरी केल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. 'छोडेंगे ना हम तेरा साथ' म्हणत ही दोस्ती कायम राहिल्यास येत्या काळात अनेक राजकीय मंडळीचे गणिते बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात सध्या आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या अनुषंगाने महाविकास आघाडी व महायुतीच्या वजा बाकीचे गणित सुरू आहे. याच दरम्यान भिन्न राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या भेटी चर्चेचा विषय ठरतात. माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे एका पेट्रोल पंपाच्या उद्घाटनप्रसंगी कार्यकर्त्याने आणलेल्या नव्या बुलेटला बघून राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रदीप नाईक (Pradip Naik) यांनी बुलेट चालवण्याचा मोह आवरला नाही.

'जाऊया डबल सीट रं…' म्हणत शिवसेना विधानसभा प्रमुख ज्योतिबा खराटे (joyotiba khrate) यांनी बुलेटवर डबल सीट सवारी केली. माहूर नगर पंचायत आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैत्रीची आठवण करून देत 'हम साथ साथ है' ची प्रचिती आणून दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तरुण वयात सर्वानाच दुचाकीची क्रेझ असते. सिंगम आणि सैराट या चित्रपटानंतर तर यात अधिकच भर पडली आहे. शुक्रवारी एका पेट्रोल पंप उद्घाटनाच्याप्रसंगी वयाची पासष्टी गाठलेल्या माजी आमदार प्रदीप नाईक यांना बुलेट चालविण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी बुलेटवर फेरफटका मारला. या वेळी माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या मागे शिवसेनेचे नेते ज्योतिबा खराटे बसले होते. त्या वेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या.

यावेळी कार्यकर्त्यानी हा प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. त्यामुळे राजकीय चर्चाना उधाण आले, तर माहूर किनवट विधानसभा मतदारसंघातील राजकीय जाणकारांनी हा व्हायरल फोटो खाली व्यक्त होत, 'परिवर्तनाची नांदी', 'ये दोस्ती हम नही तोडेंगे', असे कॉमेंट करत राजकीय वजाबाकीचे गणित सुरू केल्याने सहज टिपलेले छायाचित्र राजकीय झाल्याचे समाज माध्यमावरील वेगवगळ्या चर्चेतून दिसून आले.

(Edited by Sachin Waghmare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT