Nanded Political News : नांदेड-हिंगोलीचे संपर्कप्रमुख बबन थोरातच ; मातोश्रीकडून बळ मिळाले...

Marathwada Political News : बबनराव थोरात हेच संपर्क प्रमुख पाहिजेत, असा आग्रह पदाधिकारी, शिवसैनिकांनी धरला.
Nanded Political News
Nanded Political NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : (लक्ष्मीकांत मुळे) लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने प्रत्येक राजकीय पक्षातील घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कंबर कसली आहे‌. (Marathwada News) नांदेड जिल्ह्यात पक्ष फुटीनंतर नव्याने संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्याचे भूमीपुत्र असलेले पण सध्या पिंपरी चिंचवड येथे कार्यरत असलेल्या भाजपचे प्रवक्ते एकनाथ पवार यांना शिवबंधन बांधत धक्का दिला होता.

Nanded Political News
Imtiaz Jaleel News : रेल्वेमंत्री वैष्णव, उपमुख्यमंत्री फडणवीस खोटारडे; इम्तियाज असं का म्हणाले ?

एकनाथ पवार यांच्यावर राज्य संघटकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Shivsena) त्यांच्या निवडीमुळे कंधार- लोहा विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाला फायदा होण्याची शक्यता आहे. एकीकडे पक्ष फुटीमुळे झालेले नुकसान भरून काढत असतांना जिल्ह्यात पक्षांतर्गत कुरबुरीही वाढत आहेत. (Nanded) संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या संघटनात्मक नियुक्तीचे अधिकार आठवडाभरापुर्वी गोठवण्यात आले होते. परंतु आता पुन्हा ही जबादारी त्यांच्याकडेच कायम ठेवण्यात आली आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत संघटनात्मक पातळीवर काम सुरू आहे. परंतु नुकत्याच झालेल्या काही पदाधिकारी नियुक्ती वरून नांदेड, हिंगोली या दोन जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात व नांदेड जिल्ह्यातील एका जेष्ठ नेत्यांत मतभेद झाले होते. या मतभेदाची चर्चा थेट मोतोश्रीपर्यंत पोहचली. (Marathwada) त्यामूळे बबनराव थोरात यांच्या कामाला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर या दोन्ही जिल्ह्यांतील पदाधिकारी व शिवसैनिकांची मातोश्रीवर बैठक झाली.

या बैठकीत दोन्ही जिल्ह्यांतील पदाधिकारी व शिवसैनिकांनी बबनराव थोरात यांना पाठिंबा दर्शवला. त्यानंतर थोरात यांना पुन्हा कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले. संघटनात्मक काम वाढविण्यासाठी शिवसेनेत संपर्क प्रमुख, सहसंपर्कप्रमुखांच्या नियुक्त्या केल्या जातात. तर कधी स्थानिक पदाधिकारी व संपर्कप्रमुखांमध्ये वादाचे प्रसंगही उद्भवतात. सध्या नांदेड, हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेची नाजूक परिस्थिती आहे. खासदार हेमंत पाटील, कळमनुरीचे आमदार संतोष बांगर‌ यांच्यासह त्यांचे समर्थक शिंदे गटात सामील झाले आहेत.

अशावेळी ठाकरे गट या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी धडपडतो आहे. पण पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या वरून स्थानिक नेते आणि संपर्क प्रमुखांमध्ये खटके उडतांना दिसत आहेत. पण दोन दिवसांपूर्वी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत खासदार संजय राऊत, विनायक राऊत यांनी यावर मार्ग काढला. बबनराव थोरात हेच संपर्क प्रमुख पाहिजेत, असा आग्रह पदाधिकारी, शिवसैनिकांनी धरला आणि थोरांताचे पद आणि अधिकार कायम राहिले. शिवसेना फुटीनंतर दोन्ही जिल्ह्यांत शिवसेनेचे संघटनात्मक काम वाढविण्यासाठी थोरात यांनी प्रयत्न केले. ज्येष्ठ पदाधिकारी व शिवसैनिकात चांगला समन्वय साधत त्यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी सुरू केलेल्या कामाला आता मुंबईतील वरिष्ठांकडूनही बळ मिळाले आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com