MLA Pradnya Satav News Sarkarnama
मराठवाडा

Congress News : खासदार आष्टीकरांचा प्रज्ञा सातवांच्या उमेदवारीला विरोध; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा

Sachin Waghmare

Hingoli Political News : विधानपरिषद निवडणुकांची उमेदवारी काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना जाहीर केली. त्यानंतर पहिल्यांदा हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी नाराजी व्यक्त करीत उमेदवारी देण्यापूर्वीच त्यांना उमेदवारी जाहीर करू नये, अशी विनंती काँग्रेस हायकमांडकडे पत्र पाठवून केली होती.

दुसरीकडे आता महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अब्दुल हाफिज यांनी बुधवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडे त्यांच्या पदाचा राजीनामा सोपवला आहे. सातव यांच्या उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य रंगल्याने येत्या काळात ही नाराजी कशा प्रकारे दूर केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आगामी काळात होत असलेल्या विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने त्यांच्या वाट्याच्या जागेसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पाठवला होता. तो प्रस्ताव मंजूर करीत काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना पुन्हा एकदा काँग्रेसकडून आमदारकीची संधी दिली आहे.

काँग्रेसचे दिवंगत माजी खासदार राजीव सातव यांच्या प्रज्ञा सातव या पत्नी आहेत. मात्र, त्यांच्या उमेदवारीवरुन काँग्रेस (Congress) पक्षातील नाराजी समोर आली आहे. या उमेदवारीवरुन महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अब्दुल हाफिज यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अब्दुल हाफिज यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्यांच्या पदाचा राजीनामा दिला.

लोकसभा निवडणुकीमध्ये नव्वद टक्के मते मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीच्या बाजूने दिली आणि मराठवाड्यातील आठपैकी 7 जागा महाविकास आघाडीला निवडून दिल्या. तरी, अल्पसंख्यांक नेत्यांना प्रतिनिधित्व देण्यात आले नाही.

याशिवाय प्रज्ञा सातव यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात प्रचार केल्याची तक्रार हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिली होती. तरी देखील त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे अब्दुल हफिज (Abdul Hafij) यांनी राजीनामा पत्रामध्ये म्हटले आहे.

खासदार आष्टीकर यांनी केला होता उमेदवारीला विरोध

काही दिवसापूर्वी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही. त्यामुळे, त्यांना उमेदवारी न देता त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंगोली लोकसभेचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी काँग्रेसच्या हायकमांडकडे लेखी पत्र पाठवून केली होती.

त्यानंतर काँग्रेसकडून कसलीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य रंगल्याने येत्या काळात ही नाराजी कशा प्रकारे दूर केली जाणार याकडे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT