Varsha Gaikwad News : पहिल्याच भाषणात वर्षा गायकवाडांनी गाजवली लोकसभा; भाजपच्या जखमेवर चोळले मीठ

Congress Politcal News : देशातील जनतेने भाजपचे 400 पारचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. त्यांना केवळ 240 जागा जिंकत आल्या आहेत. भाषणात महागाईबद्दल बोलत नाहीत, अशी टीका गायकवाड यांनी केली.
Varsha Gaikwad
Varsha GaikwadSarkarnama

Loksabha News : लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने दमदार कामगिरी केली. त्यामुळे काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन कामास सुरुवात केली आहे.

आघाडीतील तीन पक्षांनी एकत्रित येत महायुतीच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी लोकसभेत बोलताना भाजपवर जोरदार टीका करीत लक्ष वेधून घेतले. (Varsha Gaikwad News)

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. या निवडणुकीत राज्य सरकरने सरकारी तिजोरीचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी केला. सरकारी यंत्रणांचा वापर केला. तरीसुद्धा पक्ष बदलणाऱ्यांना महाराष्ट्रात थारा मिळाला नाही. येथील जनतेनेच भाजपचे (Bjp) स्वप्नभंग केली असल्याची टीका यावेळी वर्षा गायकवाड यांनी केली.

मी संसद भवनमध्ये आले तेव्हा मला फार चांगले वाटले. पण संसद भवनाचे उद्घाटन आणि भूमीपूजन महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते झाले असते तर मला आणखी चांगले वाटले असते. एका आदिवासी महिलेचा सन्मान झाला असता. रामनाथ कोविंद यांनाही हा सन्मान मिळाला असता, असे म्हणत खासदार वर्षा गायकवाड यांनी लोकसभेत भाजपच्या कारभारावर टीका केली.

Varsha Gaikwad
Milind Narvekar : ठाकरे शिंदेंना धक्का देणार! मिलिंद नार्वेकरांना निवडून आणण्यासाठी कसा असेल 'गेम प्लॅन'?

देशातील जनतेने भाजपचे 400 पारचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. त्यांना केवळ 240 जागा जिंकत आल्या आहेत. भाषणात महागाईबद्दल बोलत नाहीत, अशी टीका गायकवाड यांनी केली. निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पडली नाही.

एव्हिएम मशीनवर एकसारखे चिन्ह नसायला पाहिजे होते. पण महाराष्ट्रात आपण पाहिले, ज्याठिकाणी तुतारी होती, त्याठिकाणी पिपाणी होती. जिथे मशाल होती, तिथे चिमणी होती, अशा प्रकारची कामं निवडणूक आयोगाने केली असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

Varsha Gaikwad
Shivsena News : मुख्यमंत्रीसाहेब, 'या' जिल्हाप्रमुखाची 'काळजी' घ्या, त्यांचा 'चिवट'पणा पक्षासाठी धोकादायक!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com