Prahlad Ingole: Amit Shah Sarkarnama
मराठवाडा

Prahlad Ingole: शिंदे गटाच्या नेत्याचे अमित शहांकडे साकडे; इथेनॉल निर्मिती बंदीचा निर्णय...

Nanded News: हा निर्णय मागे घेण्याची मागणी

Laxmikant Mule

Nanded: "देशांतर्गत साखरेची टंचाई निर्माण होईल, या भीतीने केंद्र सरकारने उसाचा रस,सिरप व साखरेपासून इथेनॉल निर्मिती बंद करण्याचा तुघलकी निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे वा कारखाण्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. केंद्र सरकारने हा निर्णय मागे घ्यावा व शेतकऱ्यांना ज्यादा दर देऊन जास्तीचा ऊस लागवड करण्यासाठी प्रोत्साहित करावे, अशी मागणी शिवसेनेचे (शिंदे गट) शेतकरी नेते तथा ऊसदार नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

देशांतर्गत ऊसाच्या टंचाईमुळे यंदा राज्यासह देशभरात साखरेचे उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे. यंदा साखरेच्या उत्पादनात सुमारे २० टक्के घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याचा परिणाम साखरेच्या भावात वाढ होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना गोड साखर कडु होणार आहे. याचा फटका पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बसू नये व साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी उपपदार्थ निर्मितीवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. या निर्णयावर शेतकरी संघटनांनी जोरदार टीका करुन हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली जात आहे.

यंदा उसाला समाधानकारक दर मिळेल, अशी आशा होती परंतु केंद्राच्या शेतकरी विरोधी भूमिका घेऊन उसाचा रस सिरप व साखरेपासून इथेनॉल निर्मिती करण्यावर बंदी करण्याचा निर्णय घेतला. यंदाचे ऊस उत्पादन लक्षात घेता भविष्यात साखरेची टंचाई निर्माण होईल व महागाई वाढेल या ग्राहक हितापोटी केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा समाधानकारक भाव हिसकावून घेतला. यामुळे देशभरातील उत्पादन उत्पादक शेतकऱ्यात प्रचंड नाराजी पसरली आहे. देशांतर्गत साखरेचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी हिताविरोधाचे निर्णय घेण्यापेक्षा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना चांगला दर देऊन ऊस लागवड वाढवण्या करिता प्रोत्साहित करावे, अशी मागणी शिवसेनेचे शेतकरी नेते तथा ऊसदार नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी सहकार व गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, सोयाबीन-कापसाच्या प्रश्नावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रविकांत तुपकरांची काल (शनिवारी) रात्री उशिरा मुंबईत बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर या सर्व निर्णयांसाठी रविकांत तुपकरांनी सरकारला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. सरकारने निर्णय न घेतल्यास 15 डिसेंबरनंतर सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या आंदोलनाचा राज्यात स्फोट होणार असल्याचा निर्वाणीचा इशारा, रविकांत तुपकरांनी सरकारला दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT