राम काळगे
Nilanga: "मराठा आरक्षणाचे स्वप्न पूर्ण होऊ नये, मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे नाही, असा त्यांचा डाव आहे. म्हणूनच गैरसमज पसरवून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम काही राजकीय मंडळी करीत असल्याचा आरोप छगन भुजबळ यांचे नाव न घेता मनोज जरांगे यांनी केला. "आरक्षण मिळावे म्हणून सर्व समाज पाठीशी आहे.एकवेळ आरक्षण मिळू द्या किती दम आहे ते बघतोच," असा इशारा त्यांनी भुजबळांना दिला. "छगन भुजबळांनी माझा धसका घेतला आहे, सध्या झोपेतही बरळतात,"असे ते म्हणाले.
"मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी सुरू केलेले आंदोलन ८० टक्के यशस्वी झाले असून ३५ लाख कुणबी नोंदीवरून पावणेदोन कोटी मराठ्यांना आरक्षण मिळणार आहेच, येत्या २४ डिसेंबरला ऐतिहासिक कायदा होईल," असा विश्वास मनोज जरांगे-पाटील यांनी निलंगा येथील जाहीर सभेत काल (शनिवारी) व्यक्त केला. जर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी समाजाशी दगाफटका करून वेळ मारली तर पुढची वेळ तुम्हाला जड जाईल," असा इशाराही जरांगेंनी दिला.
मराठा समाजाच्या जनरेट्यापुढे सरकारने पूर्ण हात टेकले आहेत. स्वातंत्र्याच्या अगोदरच आरक्षण होते सत्तर वर्ष का? दिले नाही असा सवाल जरांगेंनी केला. आरक्षण मिळावे, यासाठी मराठा समाजाची झालेली एकजुट काही लोकांच्या मनात खुपत आहे. मराठा आरक्षणाचे स्वप्न पूर्ण होऊ नये, त्यांना आरक्षण मिळू द्यायचे नाही, असा त्यांचा डाव आहे. त्यासाठी गैरसमज पसरवून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम काही राजकीय मंडळी करीत असल्याचा आरोप छगन भुजबळ यांचे नाव न घेता केला. आरक्षण नाही मिळाल्यास पुढची दिशा काय यासाठी १७ डिसेंबर रोजी ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!
"माझी भाषा मराठवाड्याची आहे, त्यांना नाही समजणार. आरक्षण मिळू द्यायचा नाही हा त्यांचा डाव आहे. तुम्ही सध्या मंत्री आहात, संविधानाची शपथ घेतली आहे, मंत्री पदाचा गैरवापर करू नका, मी रोज काय बोलतो आज काय बोलला, आज काय बोलला याचा धसका घेतला असून सध्या ते झोपेतही बरळतायं, आभाळ आलं की त्याचं डोकं फिरल्यावानी होतयं," अशी खिल्लीही जरांगेंनी भुजबळाचं नाव न घेता उडवली. "एकवेळ आरक्षण मिळू द्या किती दम आहे ते नंतर बघणारच आहे," असे असा दमही जरागेंनी अप्रत्यपणे भुजबळांना भरला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.