Prakash Ambedkar and Devendra Fadanvis
Prakash Ambedkar and Devendra Fadanvis Sarkarnama
मराठवाडा

फडणवीसांनी नुरा कुस्ती खेळू नये : प्रकाश आंबेडकरांचे पुन्हा टिकास्त्र

सरकारनामा ब्यूरो

औरंगाबाद : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नुरा कुस्ती खेळण्यापेक्षा आता मैदानातील कुस्ती खेळली पाहिजे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी व्यक्त केले.

वंचित बहुजन आघाडीतर्फे (Vanchit Bahujan Aghadi) कर्नाटकातील हिजाब गर्ल मुस्कान खान हिच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या सभेला पोलिसांना परवानगी नाकाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) कारभाराचा भांडाफोड करणारा पेनड्राईव्ह सादर केला. मात्र, त्यांनी सभागृहाऐवजी लोकांमध्ये जाण्याची गरज होती. पेनड्राईव्हच्या फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टनंतर काहीही निष्पन्न होणार नाही. त्यामुळे फडणवीस यांनी नुराकुस्तीचा पैहलवान होण्याऐवजी मैदानातील पैहलवान झाले पाहिजे, असा प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

राज्यातील काँग्रेस (congress), राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सरकार हे धर्मनिरपेक्ष आहे, असे मला वाटत होते. मात्र, हिजाब गर्ल मुस्कान खान हिच्या सत्काराला पोलिसांना परवानगी नाकारली त्यामुळे सरकारने धर्मनिरपेक्षता सोडल्याचे चित्र आहे. या कार्यक्रमाच्या अनुशंगाने आपण स्वतः पोलिस आयुक्तांशी वैयक्तिक बोललो. तेव्हा त्यांनी कोणत्याही प्रकारचा आक्षेप नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अचानक पोलिसांच्या वागण्यात बदल झाला. मुस्कान खान हिच्या मैसूर येथील घरी पोहचले, त्यांनी मुस्कानने औरंगाबादच्या कार्यक्रमाला येऊ नये सांगत कलम १४४ लावण्यात येईल, अशी भीती दाखवली दाखवल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.

या विरोधात न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायालयाने या प्रकरणी २२ मार्च रोजी सुनावणी ठेवली आहे. निकालानंतर आम्ही मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम घेणार असल्याचे त्यांनी सांगीतले. उत्तप्रदेशात कॉंग्रेस, बहुजन समाज पार्टी आणि एमआयएमच्या सेक्युलर मतांच्या विभाजनामुळे भाजपचे (BJP) फावले. यात हिजाब प्रकरणाचा काहीही परिणाम झाला नाही. समजावादी पार्टीच्या ८० जागा एक हजार पेक्षा कमी मताच्या फरकाने पडल्या, त्यामुळे आगामी निवडणुकीत चित्र वेगळे असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. पंजाबच्या निमित्ताने नविन ट्रेंड सुरु झाल्याचे मान्य करावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर उपस्थित होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT