चार राज्याचे निरीक्षक ठरले; मुख्यमंत्री निवडताना भाजप देणार धक्का

मुख्यमंत्री कोन असणार या बाबत भाजपचे (BJP) नेते स्पष्ट काहीच सांगत नसल्याने गोंधळाचे वातावरण आहे.
Narendra modi, Amit saha
Narendra modi, Amit sahaSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशासह (Uttar Pradesh) ४ राज्यांत पुन्हा सत्तेवर आलेल्या भाजपने (BJP) त्या-त्या राज्यांतील नवीन मुख्यमंत्र्यांची अधिकृतरीत्या निवड करण्यासाठी पर्यवेक्षकांची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) तर गोव्यासाठी कृषीमंत्री नरेंद्र तोमर व एस मुरूगन हे पर्यवेक्षक (निरीक्षक) म्हणून जातील. उत्तर प्रदेशात सोमवारी (ता.२१) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) मंत्रीमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. चारही राज्यांत पुन्हा सत्ता येऊनही गोवा व हिमाचल प्रदेशात नवीन 'कौन बनेगा मुख्यमंत्री?' याबाबत भाजपतर्फे स्पष्ट काही सांगण्यात येत नसल्याने काहीसे गोंधळाचे वातावरण आहे.

गोव्यातील प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या रणनीतीमुळे भाजपने (BJP) त्या राज्यात प्रतीकूलतेवर मात करून ४० पैकी २० जागा जिंकल्या आहेत. मात्र, पक्षाचे स्पष्ट बहुमत १ जागेने हुकलेच. गोव्यात भाजपची सत्ता येण्यास अनुकूल वातावरण असले तरी मगोपने वर्तमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विरोध केला आहे. त्यादृष्टीने केंद्रीय पर्यवेक्षक राज्यसभेचे सभागृहनेते पियूष गोयल व संघटनमंत्री बी एस संतोष हे गोव्यात जाऊन आमदारांशी व सहकारी मित्रपक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. मगोपचा सावंत यांना असलेला विरोध मावळावा, यादृष्टीने सर्वश्री संतोष व गोयल 'शक्य ते सारे' प्रयत्न करतील व मध्यरात्रीच नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची निश्चिती होईल असे समजते.

Narendra modi, Amit saha
भाजपच्या विजयानं विरोधक हादरले; अखिलेश यांच्या मित्रपक्षाकडून सर्व समित्या बरखास्त

दरम्यान, भाजपने उत्तराखंडासाठी राजनाथसिंह व विदेशराज्य मंत्री मीनाक्षी लेखी यांना पर्यवेक्षक म्हणून नियुक्त केले. मुख्यमंत्री पुष्कर धामी हेच पराभूत झाल्याने येथे भाजपच्या वतीने सर्वश्री सतपाल महाराज, अजय भट्ट आदींच्या महत्वाकांक्षाही पल्लवीत झाल्या आहेत. मात्र, धामी यांनी भाजपला पुन्हा सत्तेपर्यंत नेण्यासाठी जे परिश्रम घेतले त्यामुळे भाजप नेतृत्व उत्तराखंडाबाबत काही 'धक्कादायक' निर्णयही घेऊ शकते, अशी चर्चा आहे. मणीपूरसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन व कायदेमंत्री किरेन रिजीजू हे पर्यवेक्षक म्हणून जातील.

उत्तर प्रदेशात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून भाजप पक्ष संघटनेची व बूथ पातळीवरील बांधणीची मजबूत रचना अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येते. या 'शहा नीतीला' २०१४, २०१७, २०१९ व २०२२ शा सलग चार निवडणुकांत भरभरून यश मिळाले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही शहा यांनी पडद्याआडून महत्वाची भूमिका बजावली होती. योगी आदित्यनाथ यांचे नाव घोषित करायचे की नाही यावरून सुरवातीला पक्षात काहीसे सांसकतेचे वातावरण होते. मात्र, एकदा निर्णय झाल्यावर शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा व मुख्यतः योगी आदित्यनाथ यांनी विलक्षण समन्वय साधून प्रचार मोहीमेची आखणी केली.

Narendra modi, Amit saha
अधिवेशनात मुख्यमंत्री नितीशकुमार थेट विधानसभा अध्यक्षांवरच भडकतात तेव्हा...

शहा यांनी कैरानापासून थेट मतदारांच्या घरापर्यंत जाऊन संवाद साधला व नंतर योगी, नड्डा व अखेरीस वाराणसीत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रोड शो राज्यात झाले. ययूपीबाबत मुख्यमंत्री कोण हा प्रश्नच भाजपसमोर नाही. योगी आदित्यनाथ यांनी कालपासून दीड दिवसांचा दिल्ली दौरा करून मोदी-शहा-राजनाथसिंह-नितीन गडकरी आदी नेत्यांचे आशीर्वादही घेतले. शहा यांचा यूपीचा बारीक अभ्यास लक्षात घेता त्यांना व झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांना पर्यवेक्षक म्हणून पाठविण्याचा निर्णय स्वाभाविकपणे दिल्लीतून घेण्यात आला आहे.

संसदीय बैठकीचा उत्साह

भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक उद्या (ता.१५) संसदेच्या बालयोगी सभागृहात होणार आहे. चार राज्यांतील फेरविजयानंतर भाजपची ही पहिली संसदीय बैठक असल्याने पंतप्रधान संसदीय बैठक असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यात कोणता संदेश देणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या उत्तरार्धातील ही पहिली बैठक असून त्यसाठी उपस्थिती अनिवार्य असल्याचे भाजपच्या लोकसभा-राज्यसभेतील सुमारे ४०० खासदारांशी व्यक्तिशः संपर्क साधून कळविण्यात आले. भाजपच्या या विजयाचे शिल्पकार म्हणून मोदी यांना उद्याच्या बैठकीत भव्य पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात येईल असे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com