Prakash Ambedkar Sarkarnama
मराठवाडा

Prakash Ambedkar Big Announcement : प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा, 26 जुलैपासून वंचित 'आरक्षण बचाव' जनयात्रा काढणार

Vanchit Bahujan Aaghadi News : श्रीमंत मराठ्यांचे पक्ष असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना जोपर्यंत भूमिका मांडत नाही, तोपर्यंत तोडगा निघणार नसल्याची भूमिकाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलून दाखवली.

Deepak Kulkarni

Chhatrapati Sambhajinagar News : महाराष्ट्रात सध्या आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात तापला आहे. मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी उभ्या केलेल्या आंदोलनानंतर ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटला आहे. याचदरम्यान, आता वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी मोठी घोषणा केली आहे.येत्या 26 जुलैपासून महाराष्ट्रात 'आरक्षण बचाव' जनयात्रा काढणार असल्याचे वंचितकडून जाहीर करण्यात आले आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षावर थेट भाष्य केले आहे. आंबेडकर म्हणाले, मराठवाड्यातून आरक्षणासंदर्भातली मागणी पश्चिम महाराष्ट्र, खान्देश या ठिकाणी देखील पसरू लागलेली आहे. तसेच, वाशिम आणि बुलढाण्यातील काही भागात या आंदोलनाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

काही संघटनांची मागणी होती की, आपण वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडतोय ती गावो गावी गेली पाहिजे. त्यामुळे,या सामाजिक संघटनांना घेऊन 25 जुलैला दादर येथील चैत्यभूमीला आणि त्याचदिवशी पुण्यातील फुले वाड्यात जाणार असल्याचेही आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. शाहू महाराजांना नतमस्तक होऊन या यात्रेला सुरुवात करणार असल्याचेही आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.

येत्या 26 जुलै रोजी या यात्रेची सुरुवात कोल्हापूरमधून होणार आहेत. ही यात्रा कोल्हापूरमधून सुरु होणार असून नंतर ती धाराशिव, नांदेड,कोल्हापूर, हिंगोली, सांगली, सोलापूर,बीड, लातूर,यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा आणि जालना अशा विविध जिल्ह्यांत जाणार आहे.

या आरक्षण(Reservation) बचाव यात्रेची सांगता 7 किंवा 8 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरला होणार आहे. 25 जुलैला दादर येथील चैत्यभूमीला आणि त्याचदिवशी पुण्यातील फुले वाड्यात जाणार असल्याचेही आंबेडकर यांनी यावेळी सांगितले

आंबेडकर म्हणाले, 26 जुलै ही महत्त्वाची तारीख आहे, त्यादिवशी शाहू महाराजांनी आरक्षणाची घोषणा केली होती. त्याच धर्तीवर आम्ही या दिवशी आरक्षण बचाव यात्रेची सुरुवात करणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाला सुरुवात केली आहे तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. पण त्या सर्वपक्षीय बैठकीला महाविकास आघाडीमधील काँग्रेस, एनसीपी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातले कोणीही उपस्थित नव्हते असेही ते म्हणाले.

या बैठकीमध्ये नेमकी राजकीय पक्षांची भूमिका काय? हा प्रश्न वंचित बहुजन आघाडीकडून विचारण्यात आला. त्यामध्ये सामंजस्याने तोडगा काढायचा असेल तर श्रीमंत मराठ्यांचे पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना जोपर्यंत भूमिका मांडत नाही, तोपर्यंत तोडगा निघणार नसल्याची भूमिकाही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलून दाखवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT