Mla Prashant Bamb-Krishna Patil Dongaonkar News, Aurangabad
Mla Prashant Bamb-Krishna Patil Dongaonkar News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Prashant Bamb : गंगापूर कारखाना निवडणुकीत आमदार बंब यांचे पॅनल पिछाडीवर..

सरकारनामा ब्युरो

Aurangabad : गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. पहिल्या फेरीची मतमोजणी पुर्ण झाली असून यामध्ये भाजपचे आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांच्या शेतकरी सभासद कामगार पॅनलला दणका बसला आहे. ५७१ मतांनी बंब यांचे पॅनल पिछाडीवर आहे, तर ठाकरे गटाचे कृष्णापाटील डोणगांवकर यांच्या नेतृत्वाखालील शिवशाही शेतकरी विकास पॅनल आघाडीवर आहे.

दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू असून त्यानंतरच कारखाना कोणाच्या ताब्यात जाणार हे स्पष्ट होईल. (Sugar Factory) सध्या बंब-डोणगांवकर यांच्या पॅनलमध्ये जोरदार लढत सूरू आहे. (Shivsena) लासूर स्टेशन गटातून कृष्णा पाटील डोणगांवकर यांनी आमदार प्रशांत बंब यांच्यावर एका मताने आघाडी घेतली आहे. २० जणांच्या संचालक मंडळासाठी रविवारी ( १२ फेब्रुवारी) मतदान प्रक्रिया पार पडली होती.

आज प्रत्यक्षात मतमोजणीला सुरूवात झाली असून पहिल्या फेरीची मतमोजणी पुर्ण झाली आहे. या निवडणुकीत मतदारांचा निरुत्साह दिसून आला होता. एकूण १४ हजार ६६ मतदार सभासदांपैकी ७ हजार ५९८ जणांनीच मतदानाचा हक्क बजावला होता. ५४ टक्के इतके कमी मतदान झाल्यामुळे निवडणूकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

आतापर्यंतच्या मतमोजणीनूसार शेंदूरवादा, वाळूज, जामगाव, लासूर स्टेशन, गंगापूर या गटातून शिवशाही पॅनलचे उमेदवार आघाडीवर होते. तर अनुसूचित जाती गटातून बंब यांच्या पॅनलचे तुपलोंढे आघाडीवर होते. पहिल्या फेरीत चार हजार मतांची मोजणी झाली असून आणखी साडेतीन हजार मतांची मोजणी बाकी आहे.

अंतिम निकाल सायंकाळी सहा वाजेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. एकूण २१ संचालकांपैकी एक जागा बिनविरोध झाल्याने २० जागांसाठी ४० उमेदवार रिंगणात होते. यासाठी आज मतमोजणी होणार असून, काही वेळेपूर्वी मतमोजणीला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपचे आमदार प्रशांत बंब यांची प्रतिष्ठा या निमित्ताने पणाला लागली आहे.

मागील पंधरा वर्षांपासून बंद असलेल्या गंगापूर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडीसाठी तालुक्यातील ४० मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले होते. भाजपचे प्रशांत बंब यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सभासद कामगार पॅनेल आणि या कारखान्याचे माजी अध्यक्ष शिवसेनेचे (ठाकरे गट) कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या मार्गदर्शनाखालील शिवशाही शेतकरी विकास पॅनेलमध्ये सरळ लढत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT