MP Pratap Patil Sarkarnama
मराठवाडा

Pratap Patil : मराठा आंदोलकांनी खासदार प्रताप पाटलांच्या गाड्या फोडल्या!

Mangesh Mahale

Nanded News : मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र होत असून, पुढाऱ्यांना गावबंदी असताना नांदेडचे भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला.

गावबंदी असतानाही खासदार चिखलीकर गावात आल्याने त्यांना विरोध करून त्यांच्या ताफ्यातील दोन गाड्या आंदोलकांनी फोडल्या. कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात काल (गुरुवार) रात्री ही घटना घडली. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोहर तेलंग यांच्या भेटीसाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर रात्री अंबुलगा गावात गेले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विशेष म्हणजे कालच समाज बांधवांनी नेत्याच्या गावबंदीचा निर्णय घेतला होता. गावात चिखलीकर आणि त्याचे कार्यकर्ते येताच मराठा समाज आंदोलक जमा झाले. चिखलीकरांसोबत त्यांचा वाद झाला. चिखलीकरांना परत पाठवण्यात आले. दरम्यान, त्यांच्या ताफ्यातील दोन गाड्या आंदोलकांनी फोडल्या. वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यांनी अन्नत्याग केले आहे. वैद्यकीय पथक त्यांच्या तपासणी आले असता, त्यांनी या तपासणी न करता परत पाठवले.

दरम्यान, मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या दोन गाड्यांची मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून काल तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली.

नंतर या कार्यकर्त्यांची न्यायालयाने सुटका केली आहे. यानंतर छत्रपती संभाजी नगरमधील गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे, वसंत बनसोडे आणि राजू साठे या तिघांचा डोंबिवलीतील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सत्कार केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT