Jayant Patil : पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं, असे म्हणणाऱ्या मोदींना जयंतरावांनी करून दिली जुन्या व्हिडिओची आठवण...

Maharashtra Politics News : "किती हा विरोधाभास" असा टोला जयंतरावांनी मोदींना लगावला आहे.
Sharad pawar, Jayant Patil, Narendra Modi
Sharad pawar, Jayant Patil, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Modi in Shirdi : शिर्डीतील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना काल (गुरुवारी) थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला. माजी कृषिमंत्री राहिलेल्या शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा सवाल त्यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) उपस्थितीतच केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदींना प्रत्युत्तर देत त्यांचा जुना व्हिडिओ शेअर केला आहे. "किती हा विरोधाभास" असा टोला जयंतरावांनी मोदींना लगावला आहे.

"मी पवारांचा वैयक्तिक सन्मान करतो, पण शेतकऱ्यांसाठी काय केलं? अशी विचारणा मोदींनी काल शिर्डीत केली. आम्ही सच्चा मनाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी काम करतोय, पण महाराष्ट्रातील एका नेत्यांने शेतकऱ्यांच्या नावाखाली केवळ राजकारण केलं, अशा शब्दांत शरद पवारांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर टीका केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांनी ६० वर्षांत शेतकर्‍यांसाठी काहीही केले नाही, असे म्हणणाऱ्या पंतप्रधानांनीच पूर्वीच्या भाषणात पवारसाहेबांच्या कार्याबद्दल वस्तुस्थिती मांडली होती," असे जयंत पाटलांनी म्हटलं आहे.

2016 मध्ये पुण्यात शुगरकेन व्हॅल्यू चेन व्हिजन या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनासाठी नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर आले. त्यावेळी मोदींनी आणि पवारांनी एकमेकांवर अक्षरश: स्तुतिसुमनं उधळली.

"राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा आदर करणाऱ्यांच्या यादीत मीही एक असून, त्यांनीच मला राजकारणात बोट धरून चालायला शिकवलं," अशी प्रतिक्रिया मोदींनी या वेळी दिली. त्याचा व्हिडिओ जयंत पाटलांनी शेअर करीत मोदींना त्यांच्या जुन्या भाषणांची आठवण करून दिली आहे.

Sharad pawar, Jayant Patil, Narendra Modi
Balasaheb Thackeray On BJP: जेव्हा बाळासाहेबांनी भाजपला म्हटलं...'रक्त पिणारी कमळाबाई'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com