MLA Sambhaji Patil Nilangekar News Sarkarnama
मराठवाडा

MLA Sambhaji Patil Nilangekar : संभाजी पाटील निलंगेकरांच्या मंत्रीपदासाठी निळकंठेश्वराला अभिषेक

Prayer to God for Sambhaji Patil Nilangekar's ministerial post : संभाजी पाटील निलंगेकर यांना मंत्रीपदासाठी त्यांच्याच पक्षाचे औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्याशी स्पर्धा करावी लागत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अशी ओळख असलेल्या अभिमन्यू पवारांनीही मंत्रीपदासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

Jagdish Pansare

राम काळगे

निलंगा : महायुती सरकारच्या मुख्यमंत्री अन् दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी नुकताच पार पडला. रुसवे-फुगवे आणि मनधरणीनंतर निवडणुक निकालाच्या आठवडाभरानंतर या शपथविधी सोहळ्याला अखेर मुहूर्त लागला होता. आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे ते मंत्रीमंडळ विस्ताराकडे. येत्या 16 डिसेंबरपासून नागपूरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.

त्याआधीच मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळात आपली वर्णी लागावी यासाठी जोरात लाॅबिंग सुरू आहे. (MLA Sambahji Patil Nilangekar) आमदार मुंबईत ठाण मांडून बसले आहेत, तर त्यांचे समर्थक आपल्या नेत्याला मंत्रीपद मिळावे यासाठी देवाचा धावा करत आहे. विधानसभेच्या निलंगा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आलेले माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना 'देवाभाऊ'च्या मंत्रीमंडळात जागा मिळावी यासाठी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी निलंग्यातील निळकंठेश्वराला साकडे घालत अभिषेक केला.

संभाजी पाटील निलंगेकर यांना मंत्रीपदासाठी त्यांच्याच पक्षाचे औशाचे आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांच्याशी स्पर्धा करावी लागत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अशी ओळख असलेल्या अभिमन्यू पवारांनीही मंत्रीपदासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. अशावेळी निलंगेकर समर्थकांना आता देवाला साकडे घातले आहे.

2014 ते 2019 मध्ये राज्यातील युती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात संभाजी पाटील निलंगेकर हे कामगार मंत्री होते. आता फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आहेत. त्यांच्या प्रमाणेच आपल्याला पुन्हा मंत्रीपद मिळावे, अशी अपेक्षा निलंगेकर आणि त्यांचे समर्थक बाळगून आहेत.

यासाठीच निलंगा नगरीचे ग्रामदैवत श्री निळकंठेश्वर महादेव मंदिरात भाजपच्या वतीने अभिषेक करून साकडं घालण्यात आले. यावेळी निलंगा शहरातील माजी लोकप्रतिनिधी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आता संभाजी पाटील निलंगेकर यांना निळकंठेश्वर पावतो का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT