
Amravati News : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. तर सर्व एक्झिट पोलची आकडेवारी खोटी ठरवत महायुतीने मोठा विजय मिळवला. महायुतीने 235 जागांवर विजय मिळवला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ 50 पेक्षाही कमी जागावर समाधान मानावे लागले. या निकालावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. ईव्हीएममध्ये घोटाळा असल्याचे म्हणत विरोधकांनी आंदोलन सुरु केल्याने राज्यातील वातावरण तापले आहे. त्यातच भाजपच्या नेत्याने 'होऊन जाऊ द्या,बॅलेट पेपरवर निवडणुका,' असे म्हणत थेट विरोधकांना कोंडीत पकडले आहे. (Bjp News)
ईव्हीएमच्याविरोधात काँग्रेससह महाविकास आघाडीने आंदोलन पुकारले आहे. बॅलेटवर निवडणुका घेण्यासाठी देशव्यापी आंदोलन सुरु करण्यात येणार आहे. त्यासोबतच ईव्हीएम हटाव यासाठी रविवारपासून स्वाक्षरी मोहीम सुरु करणार असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले आहे. दुसरीकडे मारकडवाडी गावाला भेट देऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी येत्या काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यातील आंदोलन तापले आहे.
त्यातच होऊन जाऊ द्या, बॅलेट पेपरवर निवडणुका, असे म्हणत भाजप (BJP) नेत्या नवनीत राणा यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने केलेल्या आवाहनानंतर आता या वादात भाजपने उडी घेतली आहे. अमरावतीच्या खासदार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केली आहे. त्यानंतर रवी राणाही आमदारकीचा राजीनामा देतील, असे नवनीत राणा यांनी स्पष्ट केले आहे.
‘महाविकास आघाडीला ईव्हीएम मशीनवर जो आक्षेप आहे. त्यांना माझे आव्हान आहे की, अमरावती जिल्ह्याच्या खासदार यांनी राजीनामा द्यावा आणि रवी राणा देखील आपल्या आमदारकीचा राजीनामा देतील. आपले मतदान 'होऊन जाऊ द्या बॅलेट पेपरवर…’, असे म्हणत नवनीत राणा यांनी विरोधकांना ओपन चॅलेंज दिले आहे. त्यामुळे राणा यांनी दिलेल्या या आवाहनानंतर काँग्रेसचे नेतेमंडळी याला काय प्रतिसाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.