Narendra Modi Sabha For Pankaja Munde Sarkarnama
मराठवाडा

Pankaja Munde and Modi : पंकजा मुंडेंसाठी बजरंग सोनवणेंच्या 'होमपिच'वर होणार मोदींची सभा!

Beed Loksabha Constituency : नियोजनाची जबाबदारी आमदार नमिता मुंदडा आणि अक्षय मुंदडा यांच्यावर सोपलवली गेली आहे!

Datta Deshmukh

Loksabha Election 2024 : भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि महायुतीच्या बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी उद्या (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अंबाजोगाईत सभा होणार आहे. सभेच्या नियोजनाची संपूर्ण आमदार नमिता मुंदडा व त्यांचे पती अक्षय मुंदडा यांच्यावर सोपोवली गेली आहे.

बीड लोकसभा मतदार संघाची निवडणुक चुरशीची होत आहे. भाजपच्या पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे हे रिंगणात आहेत, त्यामुळे बीडमध्ये अटीतटीचा सामना रंगला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपच्या लोकसभा उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व महायुतीतील घटक पक्षांचे नेते ‘तन - मन - धनाने’ कामाला लागले आहेत. प्रत्येक जण आपापल्या विधानसभा मतदार संघातील प्रचारासह इतर बाजू सांभाळत आहे. दरम्यान, सुरुवातीला नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांची सभा बीडला घेण्याबाबत पक्षाची चाचपणी सुरु होती. मात्र, विरोधी उमेदवार सोनवणे यांचे होमपिच केज मतदार संघ असल्याने या मतदार संघात सभेचा भाजपला फायदा होण्याचा अंदाज बांधून नंतर ही सभा अंबाजोगाईला घेण्याचे निश्चित झाले.

अंबाजोगाईला मंगळवारी (ता. सात) कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrasekhar Bawankule), रिपाइं अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आदींसह जिल्ह्यातील नेते उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, या सभेच्या तयारीच्या नियोजनाची जबाबदारी भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांच्याकडे आहे. मागील आठवडाभरापासून अक्षय मुंदडा या सभेच्या तयारीच्या नियोजनात झोकून देऊन आहेत. पंतप्रधानांच्या सभेच्या प्रोटोकॉलनुसार सर्व तयारी, यंत्रणा उभा केली जात आहे. भव्य व्यासपीठ, उपस्थित मतदारांसाठी खुर्च्या, पंखे आदी व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी पाच वाजता ही सभा होणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT