Lok Sabha Election : केशर काकूंचा पराभव घडवूनच पंडितांनी डोक्यावर चढविली टोपी...

Kesharbai Kshirsagar : आपल्या पराभवाचे उट्टे काढत जेष्ठ नेते शिवाजीराव पंडित यांनी पक्षाच्या उमेदवार केशरकाकू क्षीरसागर यांचा पराभव घडवूनच विजयी उमेदवार रजनी पाटील यांच्या हाताने डोक्यावर टोपी चढविली होती.
Kesharbai Kshirsagar
Kesharbai KshirsagarSarkarnama

Beed Lok Sabha : राज्याच्या राजकारणात कायम केंद्रस्थानी असलेल्या बीड जिल्ह्याचे राजकारण अनाकलनियच आहे. निवडणुकीत अनेक धक्कादायक आणि रंजक निकाल देणाऱ्या जिल्ह्यात 1996 च्या 11 व्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे खाते उघडले. यासाठी भाजपला काँग्रेसमधूनच उमेदवार आयात करावा लागला. पण, काँग्रेस उमेदवाराच्या पराभवात त्या पक्षातीलच बड्या नेत्यानेच उघडपणे हातभार लावला. आपल्या पराभवाचे उट्टे काढत जेष्ठ नेते शिवाजीराव पंडित यांनी पक्षाच्या उमेदवार केशरकाकू क्षीरसागर यांचा पराभव घडवूनच विजयी उमेदवार रजनी पाटील यांच्या हाताने डोक्यावर टोपी चढविली होती.

जिल्ह्याच्या राजकीय घराण्यांत पंडित, क्षीरसागर, मुंडे, आडसकर, सोळंके ही प्रमुख नावे असत. यात शिवाजीराव पंडित व दिवंगत केशरकाकू क्षीरसागर (Kesharbai Kshirsagar) स्वपक्षात असूनही त्यांच्यात कायम विळ्या - भोपळ्याचे सख्य होते. केशरकाकू क्षीरसागरांचा पराभव होईपर्यंत उोक्यावर टोपी चढविणार नाही, असा पण पूर्ण करुनच शिवाजीराव पंडित यांनी विजयी भाजप खासदारांच्या हातानेच डोक्यावर टोपी चढविली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवाजीराव पंडित (Shivajirao Pandit) उच्चशिक्षीत व खेळाडू पण सुरुवातीपासूनच त्यांची राहणी म्हणजे धोतर, टोपी अशीच. काँग्रेस (Congress) पक्षाकडून जिल्हा परिषद सदस्य ते राज्याच्या मंत्रीमंडळात 13 खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी काम केले. साखर कारखाना, शिक्षण संस्था, सहकारी संस्था अशी त्यांची गेवराई तालुक्यात मोठी ताकद. याच पक्षाच्या दिवंगत केशरकाकू क्षीरसागर यांचाही जिल्ह्यात व पक्षातही चांगलाच दबदबा होता.

Kesharbai Kshirsagar
Beed Crime News : दोन कोटींचे चंदन जप्त; शरद पवार गटाच्या नगरसेवकावर गुन्हा

दरम्यान, शिवाजीराव पंडित (Shivajirao Pandit) यांचा राजकीय कारभार पाहणारे चुलत भाऊ बदामराव पंडित यांनी 1995च्या विधानसभा निवडणुकीत गेवराई मतदार संघातून शिवाजीराव पंडित (Shivajirao Pandit) यांच्या विरोधातच शड्डू ठोकला. त्यांना दिवंगत केशरकाकू क्षीरसागरांनी राजकीय आणि आर्थिक पाठबळही दिले.

या निवडणुकीत अपक्ष परंतु भाजप - शिवसेनेच्या (BJP-Shivsena) पाठींब्याने उभे असलेल्या बदामराव पंडितांनी शिवाजीरावांचा पराभव केला. चिडलेल्या शिवाजीराव पंडित यांनी डोक्यावरची टोपी काढली आणि केशरबाई क्षीरसागरांचा पराभव करेपर्यंत डोक्यावर टोपी घालणार नाही असा पणच केला.

दरम्यान, 1996ची लोकसभा निवडणूक लागली. तो पर्यंत जिल्ह्यात लोकसभेत भाजपचे खाते उघडलेले नव्हते. दरम्यान, सध्या काँग्रेसच्या राज्यसभा सदस्या असलेल्या रजनी पाटील (Rajani Patil) त्यावेळी काँग्रेसकडूनच जिल्हा परिषदेच्या सदस्या होत्या. मात्र, दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे (Gopinath Munde) यांनी रजनी पाटील यांना काँग्रेसच्या त्यावेळी खासदार असलेल्या दिवंगत केशरकाकू क्षीरसागरांविरोधात भाजपची उमेदवारी दिली.

त्यावेळी शिवाजीराव पंडित देखील काँग्रेसमध्येच होते. पण, आपल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्यांनी आपली संपूर्ण ताकद रजनी पाटलांच्या मागे उभी केली. रजनी पाटलांचा विजय झाला आणि जिल्ह्यात प्रथमच भाजपचे खातेही उघडले. मग, रजनी पाटील यांनीही त्यांच्या 'शिवछत्र' निवासस्थानी गेल्या आणि त्यांच्या डोक्यावर टोपी चढवून आभार मानले.

Kesharbai Kshirsagar
Bajrang Sonwane : साहेब, आता फक्त तब्येतीला जपा; विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो! बजरंग सोनवणेंची भावनिक साद

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com