Bajrang Sonwane, Pritam Munde Sarkarnama
मराठवाडा

Bajrang Sonwane : बजरंग सोनवणेंचं खटक्यावर बोट; 'दहा वर्षांत निष्क्रीय ठरल्यानेच प्रीतम मुंडेंचा पत्ता कट'

Datta Deshmukh

Beed Political News : केंद्रात व राज्यात सत्ता असूनही बीड जिल्ह्यात कुठलाच प्रकल्प केला नाही. दोन वेळा खासदार असतानाही डॉ. प्रीतम मुंडेंनी (Pritam Munde) चांगले काम केले नाही. काम केले असते तर त्यांची उमेदवारी का कापली, असा सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला.

बीड लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने सलग दोन वेळा खासदार असलेल्या डॉ. प्रीतम मुंडे यांना टाळून राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची उमेदवारी जाहीर केली. नेमका याच मुद्द्याला सोनवणेंनी हात घातला आहे. डॉ. प्रीतम मुंडेंनी चांगले काम केले असते तर त्यांची उमेदवारी का कटली? केंद्रात व राज्यात सरकार असताना त्यांनी विशेष काही तर केलेच नाही. शिवाय त्यांचा खासदार फंडदेखील संपूर्ण खर्च केला नाही, असा आरोपही त्यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बजरंग सोनवणे (Bajrang Sonvane) यांनी राष्ट्रवादीतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. पक्षाकडून उमेदवारीच्या स्पर्धेत बजरंग सोनवणे पुढे आहेत. दरम्यान, 2019 मध्ये झालेल्या बीड लोकसभा निवडणुकीत मला पाच लाख 9 हजार 817 मते मिळाली. त्या मतदारांचा सन्मान आणि स्वाभिमान राखण्यासाठी आणि कार्यकर्त्यांची होणारी मुस्कटदाबी व तत्व आणि विचारांशी एकनिष्ठा बाळगून सत्ताधाऱ्यांसोबत न राहता शरद पवार गटात प्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रात भाजपचे तर राज्यात भाजप मित्रपक्षांचे म्हणजे महायुतीचे सरकार आहे. महागाईने जनता होरपळत असून शेतकर्‍यांच्या मालाला हमी भाव मिळत नाही. त्यामुळे येथील शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. महायुतीच्या सरकारविरोधात राज्यातील जनतेच्या मनात प्रचंड प्रमाणात असंतोष आणि रोष व्यक्त केला जात आहे. त्यामुळे बीडची असो की अन्य लोकसभेच्या निवडणुकीचा दोर आता जनतेनेच हाती घेतल्याची परस्थिती आहे, असे बजरंग सोनवणे म्हणाले.

यंदाची लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) देशासह बीड जिल्ह्यातील जनतेच्या दृष्टीकोनातूनही महत्वाची आहे. त्यामुळे उन्नती आणि विकासाची ही निवडणूक जाती-पातीवरुन नव्हेतर विकासाच्या मुद्यावर लढली गेली पाहिजे. डॉ. प्रीतम मुंडे खासदार म्हणून निष्क्रीय ठरल्यानेच त्यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिल्याचे सोनवणे म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT