Rahul Lonikar  Sarakrnama
मराठवाडा

Bjp News : भाजप नेते लोणीकरांनी दिला पदाचा राजीनामा; नेमके कारण काय ?

Sachin Waghmare

Jalana News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्षांकडून तयारी करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

त्यांनी रविवारी भाजपचे (Bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे राजीनामा दिला असल्याचे समजते. येत्या काळात परतूर विधानसभा मतदारसंघावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ हवा असल्याचे कारण देत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. (Rahul Lonikar News)

परतूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राहुल यांचे वडील बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) हे करतात. त्यातच आता राहुल लोणीकर यांनी परतुर विधानसभा मतदारसंघावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी राजीनामा दिला असल्याने चर्चा रंगली आहे. राहुल लोणीकर हे मतदारसंघातून स्वतः उभे राहणार की वडिलांना मदत करण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला आहे, हे स्पष्ट होत नसल्याने सर्वांचे लक्ष त्यांच्या भूमिकेकडे लागून राहिले आहे.

राहुल लोणीकर यांनी आतापर्यंत भाजप युवा मोर्चामध्ये अनेक संघटनात्मक पदे भूषवले आहेत. त्याशिवाय काही काळ ते जालना जिल्हा परिषदेचे सदस्य राहिले आहेत. त्यासोबतच ते काही काळ जालना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. त्यामुळे युवा वर्गात त्यांची चांगलीच क्रेझ आहे.

दुसरीकडे बबनराव लोणीकर यांनी ही परतूर मतदारसंघाचे तीन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. 2014 सालच्या भाजप शिवसेना युतीच्या सरकारमध्ये ते पाच वर्ष राज्याचे पाणीपुरवठा मंत्री होते. याकाळी त्यांनी आघाडी सरकारच्या काळात कोट्यवधी रुपयांच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचा निधी हडप केल्याने काम रखडल्याचा प्रकार उघडकीस आणला होता. या रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टचाराचे प्रकरण उघडकीस आणून त्यांनी हडप केलेला ग्रामपंचायतींच्या निधी सरकारकडे पुन्हा जमा करण्यास लावला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT