Rajya Sabha Election : राज्यसभेसाठी दोन नावे फायनल; भाजप माजी खासदाराला तर अजितदादा देणार काँग्रेसमधून आलेल्या 'या' नेत्याला संधी?

Political News : लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री पियुष गोयल व उदयनराजे भोसले हे दोघेही लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यानंतर त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे दोन जागा रिक्त झालेल्या आहेत.
Devendra Fadanvis, Ajit Pawar
Devendra Fadanvis, Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात राज्यसभेसाठीच्या दोन रिक्त झालेल्या दोन जागांसाठी 3 सप्टेंबरला निवडणूक होत आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री पियुष गोयल व उदयनराजे भोसले हे दोघेही लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यानंतर त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे दोन जागा रिक्त झालेल्या आहेत.

या रिक्त झालेल्या दोन्ही जागा भाजपच्या (Bjp) असल्या तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यातील जागेच्या बदल्यात एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाला सोडण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती. त्यामुळे या दोन जागेसाठी नावे फायनल करण्यात आली आहेत.

राज्यसभेच्या या भाजपकडील जागेसाठी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून रावसाहेब दानवे यांच्या सागर बंगल्यावरच्या भेटीगाठी वाढलेल्या दिसत आहेत. रावसाहेब दानवे यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन मराठा मतदारांची भाजपवर असलेली नाराजी दूर करण्याचा हा प्रयत्न असल्याच समजते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागलेल्या रावसाहेब दानवे यांचे पुनर्वसन करण्यात येणार असून त्यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

त्याशिवाय या जागेसाठी परभणीतून लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागलेले रासपचे नेते व माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नावाची चर्चा आहे. बीडमध्ये पराभव स्वीकारावा लागलेल्या पंकजा मुंडे यांना भाजपने विधानपरिषदेवर संधी दिली आहे. त्यामुळे या दोघापैकी कोणाला संधी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Devendra Fadanvis, Ajit Pawar
Video Raj Thackeray News : माझ्या नादी लागू नका; नाहीतर.. राज ठाकरेंचा इशारा

दुसऱ्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून दोन नावाची चर्चा सुरु आहे. त्यामध्ये नुकतेच काँग्रेसमधून आलेले माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. अल्पसंख्याक समाजातील व्होट बँक राष्ट्रवादीकडे वळवण्यासाठी बाबा सिद्दीकी यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. त्याशिवाय मुंबईमध्ये येत्या निवडणुकीत मदत होईल या दृष्टीकोनांतून शेवटच्या क्षणी बाबा सिद्धीकी यांना राज्यसभेची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

अजित पवार गटाकडून सातारा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांचे नावही चर्चेत आहे. उदयनराजे भोसले यांना लोकसभा निवडणुकीत मदत करा, आम्ही तुमच्या नावाचा राज्यसभेसाठी विचार करू असा शब्द त्यांना अजितदादांनी दिला होता, असे समजते.

Devendra Fadanvis, Ajit Pawar
Video Raj Thackeray : राज ठाकरेंचा शरद पवार, उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, म्हणाले, 'मनोज जरांगे यांच्या आडून...'

सातारा जिल्ह्यातील वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांचे ते भाऊ आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा जोरात आहे. तर नाशिक लोकसभा मतदारसंघातून मंत्री छगन भुजबळ यांना तयारी करण्यास सांगण्यात आले होते. ऐनवेळी त्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांचे नावही चर्चेत आहे.

दरम्यान, देशभरात येत्या काळात राज्यसभेच्या बारा जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या जागांसाठी मतदान 3 सप्टेंबर रोजी होईल. मतदान संपल्यानंतर लगेच मतमोजणी होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन जागांचा समावेश आहे. राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 14 ते 21 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस 26 ऑगस्ट आहे. मतदान आणि मतमोजणी 3 सप्टेंबरला होणार आहे.

Devendra Fadanvis, Ajit Pawar
Ajit Pawar: अजित पवार पुन्हा सुटले म्हणाले, 'देवळात वाजवायला घंटाही दिला नाही'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com