Imtiaz Jaleel News Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jaleel News : रेल्वेमंत्री वैष्णव, उपमुख्यमंत्री फडणवीस खोटारडे; इम्तियाज असं का म्हणाले ?

AIMIM News : रद्द झालेल्या रोटेगाव-कोपरगावचा रेल्वेमार्ग होणार म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिरात देऊन श्रेयही घेतले.

Jagdish Pansare

Marathwada Political News : मराठवाड्यातील रेल्वे प्रकल्प व्यवहारिकदृष्ट्या परवडत नाही, असे कारण देऊन केंद्रीय रेल्वेमंत्री ते रद्द करतात. (Railway News) तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे राज्यातील उपमुख्यमंत्री आधीच रेल्वे विभागाने रद्द केलेल्या प्रकल्पाची तो होणार म्हणून जाहिरात करून श्रेय लाटतात. हे दोघेही खोटारडे आहेत, असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वेच्या एका कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी केलेल्या मागणीवर त्यांच्या भाषणातील मुद्दे खोडून काढताना टीका केली होती. त्यानंतर या विषयाच्या खोलात जाऊन इम्तियाज जलील यांनी यामागचे सत्य शोधून काढत रेल्वेमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) खोटारडे असल्याचा आरोप केला.

वैजापूर तालुक्यातील रोटेगाव ते नगर जिल्ह्यातील कोपरगाव दरम्यानच्या ३२ किलोमीटर अंतरात नवा रेल्वेमार्ग टाकण्याची मागणी कित्येक वर्षांपासून केली जात होती, परंतु रेट ऑफ रिटनचा अहवाल निगेटिव्ह येत असल्याचे कारण देत रेल्वे विभागाने हा मार्ग रद्द केला होता. (AIMIM) एप्रिल २०२२ मध्ये हा मार्ग रद्द केल्याचे रेल्वे विभागाचे पत्र खासदार इम्तियाज जलील यांनी मिळवले. दरम्यान, ऑक्टोबर २०२२ च्या छत्रपती संभाजनगर येथील कार्यक्रमात इम्तियाज जलील यांनी रेट ऑफ रिटनच्या निकषामुळे मराठवाड्यावर अन्याय होत आहे, असा मुद्दा आपल्या उपोषणात उपस्थितीत केला.

यावर रेल्वेमंत्री वैष्णव यांनी आपल्या भाषणात इम्तियाज यांची खिल्ली उडवताना ते यूपीए सरकारच्या किंवा जुन्या काळातील गोष्टी सांगत आहेत. हे मोदी सरकार आहे, इथे रेट ऑफ रिटनचा विचार न करता गरजेचे सगळे रेल्वे प्रकल्प केले जातात, त्यासाठीच रेल्वेचे बजेट त्यांनी वाढवून दिल्याचा दावा केला होता. विशेष म्हणजे जूनमध्ये रेट ऑफ रिटनच्या निगेटिव्ह अहवालामुळेच रोटेगाव-कोपरगाव हा नवा रेल्वेमार्ग रद्द करण्यात आला होता. तरीही रेल्वेमंत्र्यांनी जाहीरपणे खोटी माहिती देत आपल्या मंत्री आणि कार्यकर्त्यांना खूष केले होते. व्यासपीठावरील सगळ्याच मंत्री, आमदारांनी तेव्हा टाळ्या वाजवून मला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला होता.

एवढ्यावरच हा प्रकार थांबला नाही, तर जूनमध्ये रद्द झालेल्या रोटेगाव-कोपरगावचा रेल्वेमार्ग होणार म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये पूर्ण पान जाहिरात देऊन हा प्रकल्प होण्याचे श्रेयही घेतले. हा प्रकल्प रद्द झाल्याचे रेल्वे विभागाचे पत्र माझ्याकडे आहे, मग खुद्द रेल्वेमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री वर्तमानपत्रात तो होणार म्हणून ढळढळीत खोटं कसं सांगू शकतात? असा सवालही इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला. भाजपच्या नेत्यांना चहा पित खोट बोलण्याची सवय जडली आहे. त्यामुळे त्यांच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश आपण यापुढेही करतच राहू, असा इशाराही इम्तियाज यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT