Loksabha Election: भाजपचा विजयी रथ काँग्रेस रोखणार ? मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी आखला मोठा 'प्लॅन'

BJP VS Congress: कर्नाटकातील लोकसभेच्या वीस जागा जिंकण्याचे काँग्रेसचे लक्ष्य
BJP VS Congress
BJP VS CongressSarkarnama
Published on
Updated on

Karnataka News: आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने आतापासूनच सुरू केली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला चारी मुंड्या चित केल्याने उत्साह काहीसा दुणावला आहे.

त्यामुळेच गेल्या वेळेस लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढत भाजपचा विजयी रथ कर्नाटकात रोखण्याचा प्रयत्न काँग्रेसने सुरू केला आहे. नुकत्याच काँग्रेस नेत्यांच्या झालेल्या बैठकीत कर्नाटकातील लोकसभेच्या २८ पैकी २० जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्याने शनिवारी या संदर्भात बैठक घेऊन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. यामध्ये लोकसभेच्या 28 पैकी 20 जागा जिंकण्याचे काँग्रेसचे लक्ष्य असणार आहे. त्यानुसार बैठकीत रणनीती आखण्यात आली.

त्यानुसार या बैठकीस उपस्थित असलेल्या राज्य मंत्रिमंडळातील १९ सहभागी मंत्र्यांना सूचना देण्यात आल्या. गेल्या लोकसभा निवडणुकीत या ठिकाणी काँग्रेसला सपाटून मार खावा लागला होता. त्यामुळे यावेळेस पराभवाचा बदला घेण्याची संधी चालून आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कर्नाटकात २०१९ लोकसभा निवडणुकीत २८ पैकी १७ जागी भाजपने, तर ९ जागी काँग्रेसने विजय मिळवला होता तर जनता डाळ सेक्युलरने दोन जागी विजय मिळवला होता. त्यामुळे आगामी काळात भाजपच्या जागा कमी करत त्यांचा विजयी रथ रोखण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारकडून मदत न मिळाल्याने नाराजी

या बैठकीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. या वेळी 28 पैकी 20 जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला असून, त्या दृष्टीने आम्ही कामाला लागलो आहोत, असे बैठकीनंतर बोलताना कर्नाटकचे परिवहनमंत्री रामलिंग रेड्डी यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा या वेळी आढावा घेतला. दुष्काळी परिस्थितीत केंद्र सरकारकडून कोणतीच मदत न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

Edited By - Ganesh Thombare

BJP VS Congress
C Voter Survey MP Election : मध्य प्रदेशात भाजप सत्ता गमावणार ? ताज्या सर्व्हेत काँग्रेसला अच्छे दिन!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com