Raja Shivaji showcases the life of Chhatrapati Shivaji Maharaj, with Riteish Deshmukh delivering a powerful performance in this historical blockbuster. Sarkarnama
मराठवाडा

Raja Shivaji Movie : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाबाबत ठाकरेंच्या नेत्याने थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहित केली सर्वात मोठी मागणी

Shiv Sena UBT on Raja Shivaji Movie : 'सदर 'राजा शिवाजी' या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रभावी मांडणी करण्यात येत असून त्यांच्या पराक्रमा सोबतच लोककल्याणकारी दृष्टिकोन, प्रशासन कौशल्य, गनिमी काव्याची रणनीती आणि महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान नव्या पिढीसमोर सशक्तपणे उभे राहणार आहे.'

Jagdish Pansare

Raja Shivaji Movie Tax Free Demand : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'राजा शिवाजी' चित्रपट सध्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालतो आहे. अभिनेता रितेश देशमुख यांनी साकारलेल्या शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कमाईच्या बाबतीत दोन दिवसांत या चित्रपटाने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. अशावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हा चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना सविस्तर पत्र लिहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन कार्य त्यांचे अद्वितीय शौर्य, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेचा महान इतिहास हा महाराष्ट्राच्या तसेच संपूर्ण देशाच्या अस्मितेचा कणा आहे. त्यांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे केवळ राज्यव्यवस्था नसून न्याय समानता, स्त्री सुरक्षा, शेतकरी संरक्षण व धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांवर आधारित एक आदर्श शासन पद्धती होती.

सदर 'राजा शिवाजी' या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रभावी मांडणी करण्यात येत असून त्यांच्या पराक्रमा सोबतच लोककल्याणकारी दृष्टिकोन, प्रशासन कौशल्य, गनिमी काव्याची रणनीती आणि महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान नव्या पिढीसमोर सशक्तपणे उभे राहणार आहे. विशेषत: युवकांमध्ये राष्ट्रभक्ती स्वाभिमान आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यास हा चित्रपट उपयुक्त ठरणार आहे.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसांचे संवर्धन आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने अशा प्रकारचे चित्रपट समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम ठरतात. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांपर्यंत हा चित्रपट पोहोचावा तसेच विद्यार्थ्यांना व सर्वसामान्य जनतेला तो सहज उपलब्ध व्हावा यासाठी सदर चित्रपटास राज्य शासनाकडून कर मुक्ती देणे अत्यंत आवश्यक आहे.

उपरोक्त वस्तुस्थिती लक्षात घेता 'राजा शिवाजी' या चित्रपटास महाराष्ट्र राज्यात कर मुक्त घोषित करण्याबाबत आपल्या स्तरावरून संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी मागणी या पत्राद्वारे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' सिनेमानं बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 11.35 कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच, शनिवारी 10.55 कोटींची कमाई केली. पण, तिसऱ्या दिवशी सिनेमानं जोरदार मुसंडी मारत 12 कोटींचा गल्ला जमवला आहे. म्हणजेच, एकूण तीन दिवसांत या चित्रपटाने एकूण 33.90 कोटींची कमाई केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT