BJP-Congress News : देशातील महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळणार होतं, पण काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी हे बील मंजूर होऊ दिले नाही, त्या विरोधात मतदान केले. त्यामुळे या पुढे कोणत्याच निवडणुकीत काँग्रेस पक्षाला निवडून देऊ नका, असे आवाहन खासदार अशोक चव्हाण यांनी केले होते.
त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कुठलेही आरक्षण नसताना काँग्रेस पक्षानेच अशोक चव्हाण यांच्या घरात त्यांच्या पत्नीला उमेदवारी देऊन आमदार केले होते, याचा विसर त्यांना पडला आहे का? असा सवाल केला.
74 व्या घटनादुरुस्तीनंतर महिलांना 33 टक्के राजकीय आरक्षण दिले होते, तेव्हा त्यांचे पिताश्री अशोक चव्हाण हे देशाचे गृहमंत्री होते. स्वतः अशोक चव्हाण काँग्रेसचे खासदार असताना महिलांना पन्नास टक्के राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय झाला होता, याची आठवण हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांना करून दिली. आतापर्यंत अशोक चव्हाण हे काँग्रेससाठीच जोगवा मागत होते, त्यामुळे त्यांनी काँग्रेसवर केलेला आरोप आणि वक्तव्य हे हास्यास्पद असल्याची टीका केली.
राहुल गांधी यांच्याशी आपले चांगले संबंध आहेत, असा दावा खासदार अशोक चव्हाण यांनी केला, याकडे माध्यमांनी सपकाळ यांचे लक्ष वेधले. यावर काँग्रसेचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे यांनी अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडला तेव्हा महाराष्ट्रातील एका नेत्याचा दाखला देत केलेल्या विधानाची आठवण करून दिली.
मला जेलमध्ये टाकतील म्हणून मी पक्ष सोडत आहे, असं एक महाराष्ट्रातील मोठा नेते राहूल गांधी यांच्याजवळ रडला होता. मला वाटतं ते अशोक चव्हाणच असतील, कारण त्यांचे राहुल गांधी यांच्याशी चांगले संबंध आहे, असा दावा त्यांनीच केला आहे. त्यामुळेच ते राहुल गांधी यांच्याजवळ रडले असतील, असा टोलाही सपकाळ यांनी लगावला.
अशोक चव्हाण यांनी महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर न होण्याला काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याचा आरोप करत नांदेडमध्ये एका कार्यक्रमात महिलांना या पक्षाला आता कोणत्याच निवडणूकीत निवडून येऊ देऊ नका, असे आवाहन केले होते. यावरून सध्या काँग्रेस-भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.