शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या गैरहजेरीमुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या आहेत.
राजन साळवी यांच्या बैठकीआधी सावंत यांना कार्यक्रमातून डावलल्यामुळे जोरदार वाद निर्माण झाला.
या वादानंतर राजन साळवी यांनी पुढे येऊन स्पष्टीकरण दिलं, पण पक्षात कलह असल्याची चर्चा कायम आहे.
Dharashiv News : शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारे तानाजी सावंत त्यांच्या मतदारसंघात फिरकलेच नाही अशी तक्रार होत आहे. तर ते शिवसेनेत नाराज असल्याचीही जोरदार चर्चा आहे. अशातच समन्वयक राजन साळवी यांच्या बैठकीअगोदर येथे वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून आलं आहे. शिवसेनेच्या कार्यक्रमातून आमदार तानाजी सावंत यांना डावलल्यावरून जोरदार राडा झाला होता. ज्यानंतर राजन साळवी यांना पुढे येऊन स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. (Tanaji Sawant ignored in Shiv Sena event and what did Rajan Salvi clarify about the controversy?)
शिवसेना समन्वयक राजन साळवी यांच्या नेतृत्वातील धाराशिव येथे सोमवारी (ता.28) समन्वय बैठक पार पडली. यावेळी तानाजी सावंत यांच्या कट्टर समर्थकांनी राडा घातला. तसेच धाराशिव शिवसेना जिल्हाप्रमुखाने लावलेल्या बॅनरवरून आमदार तानाजी सावंत यांचाच फोटो गायब का झाला. तानाजी सावंत यांना का डावलण्यात आले अशी विचारना करत बैठकीत गोंधळ घालत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यानंतर आता राजन साळवी यांनी स्पष्टीकरण देताना वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी, मी कोकणातला असूनही मला मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांची जबाबदारी देण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. त्यामुळे मी येथे आहे. पण शिवसेना असो किंवा येथील कार्यकरणी यातून तानाजी सावंत यांना डावलण्याचा प्रश्नच येत नाही. ते नाराज आहेत असे म्हणणेच मुळात चुकीचे आहे.
तानाजी सावंत हे जिल्ह्याचे नेते असून त्यांचे लोक तळागाळापर्यंत लोकांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे ते मतदारसंघात फिरत नाहीत असे म्हणणे योग्य नाही. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कात्रज येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या भेट घेतली आहे. सावंत यांची नुकतीच ॲंजिओप्लास्टी झाल्याने शिंदे यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याचेही ते म्हणाले. तर समन्वयक समितीच्या बैठकीत कोणताच राडा झाला नाही असाही दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान साळवी यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल करताना जहरी टीका देखील केली. त्यांनी, सर्व सामान्य शिवसैनिकांचे दुःख, वेदना, याचना उद्धव ठाकरेंना माहित नाहीत. त्या यांच्यापर्यंत पोहचत नाहीत, तर त्यांचे नेते त्या पोहचवत नाहीत असा दावा केला आहे. साळवी यांनी शिवसेनेत होणारी गळतीवर उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधताना उद्धव ठाकरे यांनी आपल्याला लोक का सोडून जात आहेत. याचे आत्मचिंतन करायला हवं. तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील आत्मचिंतन करावं असा सल्ला दिला आहे.
1. तानाजी सावंत कोणत्या कार्यक्रमात गैरहजर होते?
राजन साळवी यांच्या समन्वयक बैठकीआधी झालेल्या कार्यक्रमात तानाजी सावंत सहभागी नव्हते.
2. सावंत यांना का डावलण्यात आलं?
या कार्यक्रमात सावंत यांना डावलल्याचं बोललं जात असून त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. कारण अद्याप स्पष्ट झालेला नाही.
3. राजन साळवी यांनी काय स्पष्टीकरण दिलं?
साळवी यांनी वादानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, कोणताही भेदभाव नसल्याचं सांगितलं. पण वादावर पडदा पडलेला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.