Rajan Salvi News : 'केसरकर,सामंत मंत्री झाले,पण मी तसाच ...'; साळवींनी शिंदेंसमोरच बोलून दाखवली खंत

Rajan Salvi Join Shivsena Political News : 'मातोश्री'शी एकनिष्ठ समजले जाणारे आणि उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक असलेल्या राजन साळवींनी अखेर ठाण्यात उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता.13) शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
Rajan Patil Join Shivsena  (1).jpg
Rajan Patil Join Shivsena (1).jpgSarkarnama
Published on
Updated on

Thane News : गेले अनेक दिवसांपासून राजापूर मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. आधी ते भाजपमध्ये जाणार असल्याचं बोललं जात होतं. नंतर त्यांनी शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं सांगण्यात येत होतं. पण आता साळवींनी या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देतानाच उद्धव ठाकरेंची साथ सोडत अखेर जोरदार शक्तिप्रदर्शन करत त्यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र, या शिवबंधन तोडत धनुष्यबाण हाती घेतलेल्या राजन साळवींनी (Rajan Salvi) मंत्रिपदाबाबतची मनातली खदखद बोलून दाखवली.

'मातोश्री'शी एकनिष्ठ समजले जाणारे आणि उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक असलेल्या राजन साळवींनी अखेर ठाण्यात उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता.13) शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी साळवींसोबत कोकणातील असंख्य पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी राजन साळवी म्हणाले,2014 ला भाजपसोबत आपली सत्ता आली. त्यावेळी मला वाटलं होतं की,माझ्यासारखा एक निष्ठावंत शिवसैनिक मंत्री होईल. मंत्रिपदासाठी स्वत: शिंदे साहेबांनी उद्धव ठाकरेंकडे माझी शिफारस केली होती. पण दुर्दैवानं होऊ शकलो नाही.पण आता नाव घ्यावंच लागेल असं म्हणत त्यांनी सगळंच मनातलं बाहेर काढलं.

Rajan Patil Join Shivsena  (1).jpg
MP Sanjay Jadhav News : दिल्लीत शिंदेंच्या मंत्र्याच्या पंगतीत जेवले, तरी परभणीकरांना 'बंडू बॉस'वर विश्वास!

2014 साली भाजपसोबत आपली सत्ता आली.त्यावेळी मला वाटलं होतं की,माझ्यासारखा एक निष्ठावंत शिवसैनिक मंत्री होईल. मंत्रिपदासाठी स्वत:शिंदे साहेबांनी उद्धव ठाकरेंकडे माझी शिफारस केली होती. पण दुर्दैवानं होऊ शकलो नाही. पण आता नाव घ्यावंच लागेल.विनायक राऊतांनी त्यावेळी दीपक केसरकरांना मंत्रिपद दिलं. त्यानंतर 2019 ला वाटलं मंत्री होईल. तीही संधी गेली. त्यावेळी राष्ट्रवादीतून उदय सामंत शिवसेना पक्षात आले,तेही मंत्री झाले. माझ्या पाठीमागून येऊन केसरकर,सामंत मंत्री झाले पण मी तसाच राहिलो. अशी खंतही एकनाथ शिंदेंसमोरच साळवींनी बोलून दाखवली.

2024 च्या निवडणुकीत माझा पराभव झाला, तोही न्यही केला.2006 साली जो पराभव झाला तो झाला. पण 2024 निवडणुकीत माझा जो पराभव झाला,तो माझ्या,कुटुंबाच्या माझ्या समर्थकांच्या जिव्हारी लागला.

Rajan Patil Join Shivsena  (1).jpg
Harshavardhan Sapkal : मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, राहुल गांधींची महाराष्ट्रासाठी खास रणनीती!

साळवी यांनी आपण बाळासाहेबांचा लाडका शिवसैनिक आहे.त्यांना अभिप्रेत असलेले काम मी आजपर्यंत केले आणि त्यांच्याच विचारांचे काम मी पुढे नेणार आहे. माझ्या पराभवाला जी मंडळी कारणीभूत आहेत, त्या संबंधीची माहिती,पुरावे मी उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले. त्यानंतर वाटलं आता थांबावं असं वाटल्याची भावनाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.

पण माझ्या राजापूर मतदारसंघातील माणसं,त्यांचा विकास,रत्नागिरी जिल्ह्याचा विकास यासाठी मी पुन्हा उमेदीनं उभं राहिलं पाहिजे, असा आग्रह या मंडळींनी धरला. विकासाच्या दृष्टीनं विचार करता एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व महाराष्ट्रानं स्वीकारलं आहे. त्यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा शिवसेना, धनुष्यबाण घेऊन लोकांमध्ये जाऊ’ असे राजन साळवींनी म्हटले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com