Rajendra Jagtap sarkarnama
मराठवाडा

Rajendra Jagtap : '...तर मुस्लिम समाज काँग्रेस, शरद पवार गटापासून लांब जाईल', माजी आमदाराला कशाची भीती?

Datta Deshmukh

Rajendra Jagtap News : पुरोगामी विचारांची कास धरून, सर्वसमावेशक धोरणाचे तोरण बांधून, प्रत्येक समाजघटकांना यथायोग्य प्रतिनिधित्व देण्याची आदर्श प्रथा आणि परंपरा काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मोडीत

काढली. गत विधानपरिषदेच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाला उपेक्षित ठेवल्याचे सर्वसामान्य मतदाराला अजिबात पचनी पडलेला नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला या पक्षाचे माजी आमदार राजेंद्र जगताप यांनी दाखविला आहे.

आगामी निवडणुकीत मुस्लिम समाजाला मतदानाच्या तुलनेत योग्य प्रतिनिधित्व दिले नाही तर त्याचे परिणाम निवडणुकीत दिसतील, अशी भीतीही राजेंद्र जगताप यांनी व्यक्त केली आहे.

आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षांनी मुस्लिम समाजाचा सन्मान करावा. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांनी त्यांच्या स्थापनेपासूनच्या आजपर्यंतच्या राजकीय प्रवासाला न शोभणारा अपवाद मागच्या विधान परिषद निवडणुकीत केला. परिणामी या दोन्ही पक्षाच्या पारंपरिक मतदारांच्या भावनांचा आनादर घडला. त्यामुळे त्याचा परिणाम पुढील निवडणुकीत दिसेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीत जाणते अजाणतेपणी झालेल्या या आगळीकीला सुधारण्याची संधी आगामी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून दोन्ही पक्षांना उपलब्ध झाली आहे . काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) आगामी काळात मुस्लिम समाजाच्या निर्णायक ठरू शकणाऱ्या मतदानाचे महत्त्व ओळखून त्यांच्या संख्येच्या प्रमाणात त्यांना राज्यभर विविध मतदारसंघात उमेदवारी द्यावी, असा सल्लाही राजेंद्र जगताप यांनी दिला.

समाजाला प्रतिनिधीत्व दिल्यास हा मुस्लिम समाज साथ देईल, अन्यथा त्यांची निर्णायक मतदान ते इतरत्र वळण्याची भीतीही आहे, असे जगताप म्हणाले. तसेच संभाव्य परिस्थीतीचा आणि त्याच्या दूरगामी परिणामांचा विचार करून या दोन्ही पक्षांनी मुस्लिम उमेदवारांना सन्मानजनक संख्येने उमेदवारी देऊन मुस्लिम समाजाचे पालकत्व घ्यावे, असे आवाहन देखील जगताप यांनी केले.

मुस्लिम समजाला आरक्षण द्यावे

राजेंद्र जगताप यांनी या समाजाला आरक्षणाची गरजही व्यक्त केली आहे. स्वातंत्र्य काळापासून मुस्लिम समाज मागास अवस्थेत असुन या समाजाला प्रगतीपथावर नेण्यासाठी शैक्षणिक ,सामाजिक व राजकीय आरक्षणाची नितांत आवश्यकता आहे. सामाजिक जीवनमान सुधारण्यास या सर्व क्षेत्रातील आरक्षण त्यांना मिळणं अत्यावशक आहे. त्यामुळे मुस्लिमांना आरक्षण मिळवून देण्याची भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरपणाने घ्यावी, अशी मागणीही राजेंद्र जगताप यांनी केली.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT