Jalna Politics : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री राजेश टोपे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना त्यांनी स्वत: पूर्णविराम दिला असला तरी ही चर्चा काही केल्या थांबलेली नाही. दरम्यान जालना-छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करताना टोपेंची अनुपस्थिति या सर्व चर्चांना आणखी हवा देणार ठरली आहे. यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चांना रंग चढला आहे.
विशेष म्हणजे काल राजेश टोपे हे जालन्यात होते. असे असताना त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करताना दांडी मारली याचे सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. गेल्या काही दिवसपासून राजेश टोपे हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. विधान परिषदेच्या जालना-छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळणार असे बोलले जात होते.
राजेश टोपे यांनी स्वतः याचे खंडन केले. मी कुठेही जाणार नाही, माझ्या बाबतीत पसरवले जाणारे वृत्त हे खोटे, चुकीचे असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले. शिवाय भाजप महायुतीकडून सुहास शिरसाट यांची उमेदवारी जाहीर होऊन त्यांनी आपला अर्जही दाखल केला. त्यानंतर ही चर्चा थांबली होती, मात्र भाजपत जाणार नाही सांगणाऱ्या टोपे यांची महाविकास आघाडीचा उमेदवार अर्ज दाखल करतानाची अनुपस्थितीने पुन्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेसचे नेते हजर असताना जालना जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकमेव नेते असलेले राजेश टोपे गैरहजर का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जालन्यातच असतांना त्यांनी महाविकास आघाडीला का टाळले? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, जालन्यातील भाजपचे नेते तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राजेश टोपे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल विचारले असता स्मित हास्य करत हे तुम्ही मला कशाला विचारता? त्यांनाच विचारा, असे म्हणत सस्पेंस वाढवला. त्यांनी भाजपत जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे, याकडे लक्ष वेधले, तर मग ते येणार नाहीत, अशी गुगली दानवे यांनी टाकली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.