Rajesh Tope : प्राजक्त तनपुरेंसोबत राजेश टोपेंचाही भाजपप्रवेश होणार? अखेर सत्य समोर आले, मिळाली नेमकी माहिती!

NCP Sharad Pawar faction News : विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे.
Rajesh tope
Rajesh tope Sarkarnama
Published on
Updated on

सुभाष बिडे

Rajesh Tope News : विधानपरिषदेच्या छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी महायुतीतील भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. विधानपरिषदेच्या 17 पैकी 16 जागांचे वाटप झाले असले तरी या मतदारसंघाचा तिढा अजून सुटलेला नाही. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री राजेश टोपे यांच्या भाजप प्रवेशाच्या आणि जालना-संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासोबतच टोपे यांचाही भाजपप्रवेश होणार असल्याच्या चर्चा समाजमाध्यमांमध्ये आहेत. पण या सर्व चर्चा फेटाळून लावत आपल्या भाजप प्रवेशाबद्दलच्या चर्चा व सोशल मिडियावरील बातम्या या निराधार, चुकीच्या असल्याचे टोपे यांनी म्हटले आहे. शिवाय आपण अंकुशनगर येथील समर्थ सहकारी साखर कारखाना आणि घनसावंगी परिसरातच आहोत. त्यामुळे मुंबईत भाजपत प्रवेश होणार, उमेदवारी मिळणार या केवळ चर्चा असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

टोपे आजच्या भाजपप्रवेशाचे वृत्त फेटाळले असले तरी ते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत, हेही उघड आहे. त्यांनी तशी तयारीही केली आहे. जिल्ह्याच्या राजकारणात तशा भूमिका घेत भाजपविरोधही मवाळ केला आहे. पण ज्याप्रमाणे तनपुरे यांना शब्द मिळाला, तसा टोपे यांना भविष्यातील राजकारणाचा कोणातही शब्द मिळालेला नाही.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून आता पक्षात घेऊन टोपे यांना विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याचाच सल्ला देण्यात येत असल्याची माहिती आहे. त्यामुळेच टोपे कधी भाजपमध्ये प्रवेश करणार हे अद्यापही निश्चित झालेले नाही, मात्र आज त्यांचा भाजपप्रवेश होणार नाही हे निश्चित मानले जात आहे. सध्याची बदललेली राजकीय परिस्थिती पाहता ते देखील भाजपचा मार्ग धरू शकतात असे संकेत मिळत आहेत.

विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोनच दिवस शिल्लक आहेत. अशात महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांना अहिल्यानगरच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे. त्यांच्यासोबतच राजेश टोपे हे भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात होती.

Rajesh tope
Amravati MLC Election : विधानपरिषदेचा धुरळा : अमरावतीत भाजपसाठी धोक्याची घंटा! काँग्रेसने ताकद लावल्यास 'गेम' उलटणार

राजेश टोपे हे 1999 पासून सलग 25 वर्षे ते विधिमंडळात आमदार राहिले आहेत. जालना जिल्ह्यातील अंबडमधून दोनवेळा तर घनसावंगी मतदारसंघातून तीनवेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. ठाकरे सरकार त्यांनी आरोग्यमंत्री म्हणून काम केले आहे. कोविड-१९ च्या संकटात रोज सोशल मीडिया आणि माध्यमांद्वारे जनतेशी संवाद साधत, आरोग्य यंत्रणा सांभाळणारे मंत्री म्हणून त्यांनी मोठी लोकप्रियता मिळवली.

राजेश टोपे यांना राजकारणाचा वारसा त्यांचे वडील अंकुशराव टोपे यांच्याकडून मिळाला. ते सहकार क्षेत्रातील मोठे नेते आणि खासदार राहिले होते. जालना आणि मराठवाडा भागात सहकार चळवळ मजबूत करण्यात टोपे कुटुंबाचा मोठा वाटा आहे. समर्थ सहकारी साखर कारखाना, सागर कारखाने आणि विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी जालना जिल्ह्यात मोठे जाळे निर्माण केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com