Rajesh Tope-Abdul Sattar-Sandipan Bhumre Sarkarnama
मराठवाडा

Rajesh Tope : सत्तार-भुमरे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडत आहेत ; आघाडीत असे चालणार नाही..

मी माझ्या परीने त्यांना समाजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. शेवटी महाविकास आघाडी सरकार अशा फोडाफोडीच्या राजकारणाला स्थान असता कामा नये. (Rajesh Tope)

लक्ष्मण सोळुंके

औरंगाबाद : शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार यांच्यामुळे राष्ट्रवादीच्या (Ncp) कार्यकर्त्यांना त्रास होत आहेत. सत्तेच्या सोपानासाठी हे दोघेही राष्ट्रवादीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये फोडाफोडी करत आहेत, असा आरोप राज्याचे आरोग्य मंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केला. (Shivsena) मी माझ्या पद्धतीने दोघांनीही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, महाविकास आघाडीत हे चालणार नाही, असेही टोपे म्हणाले.

औरंगाबादेत राष्ट्रवादी भवनात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलतांना टोपे यांनी हा आरोप केला. गेल्या महिन्यात शिवसेनेची संपर्क मोहिम मराठवाड्यात (Marathwada) पार पडली. यावेळी सर्वच जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी विरोधात नाराजीचा सूर लावला होता. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची कामे होत नाहीत, त्यांना मान सन्मान दिला जात नाही, अशा असंख्य तक्रारी या संपर्क मोहिमेत मांडण्यात आल्या होत्या.

आता असाच काहीसा नाराजीचा सूर राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या बाबतीत लावला जात आहे. राजेश टोपे यांनी स्वतः शिवसेनेचे मंत्री भुमरे व सत्तार हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडत असल्याचा आरोप केला आहे. टोपे म्हणाले, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास होतोय, याची मला जाणीव आहे. भुमरे-सत्तार हे दोघेही आपल्या सत्तेसाठी आमच्या कार्यकर्त्यांची फोडाफोडी करत आहेत, त्यांना त्रास देत आहेत.

मी माझ्या परीने त्यांना समाजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. शेवटी महाविकास आघाडी सरकार अशा फोडाफोडीच्या राजकारणाला स्थान असता कामा नये. सगळ्यांनी एकत्रितपणे काम केले तरच महाविकास आघाडीचे सरकार व्यवस्थित चालू शकेल. आघाडीचा धर्म पाळावा, असे आपण शिवसेनेच्या या दोन्ही नेत्यांना सांगणार आहोत, असेही टोपे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT