Supriya Sule : थोडा एंटरटेन्मेंट होना चाहिये.. तो येईल, भाषण करून निघून जाईल...

थोडं एंटरटेन्मेट पण होऊ द्या ना. रोज दुरदर्शन काय पहायचे? कधी स्टार प्लस पण पहा. किती दिवस सिरियस पिक्चर पहाणार, थोडं मनोरंजन देखील व्हायला पाहिजे की नको? (Supriya Sule)

Supriya Sule,Raj Thackeray
Supriya Sule,Raj Thackeraysarkarnama
Published on: 
Updated on: 

औरंगाबाद : राज ठाकरे यांच्या औरंगाबादेतील १ मे रोजीच्या सभेवरून वातावरण चांगलेच तापले आहे. (Aurangabad) काय होणार? सभा होणार की नाही? याची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. असे असतांना राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मात्र या सभेला फार महत्व देऊ नका, तो येईल भाषण करून जाईल, तुम्ही तुमचे काम करा, अशा शब्दात ठाकरेंच्या (Raj Thackeray) सभेची खिल्ली उडवली. थोडा एन्टरटेन्मेंट भी होना चाहिये, असा टोला देखील त्यांनी लगावला.

सुप्रिया सुळे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलतांना त्यांनी राज ठाकरेंच्या सभेला फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे सांगत टीका केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, कशाला त्यावर एवढी चर्चा करता, तो येईल भाषण करून निघून जाईल. तुम्ही तुमचे काम कराना. त्याला इतके महत्व कशाला देता?.

थोडं एंटरटेन्मेट पण होऊ द्या ना. रोज दुरदर्शन काय पहायचे? कधी स्टार प्लस पण पहा. किती दिवस सिरियस पिक्चर पहाणार, थोडं मनोरंजन देखील व्हायला पाहिजे की नको? असा टोला देखील सुळे यांनी यावेळी लगावला. सुळे यांच्या या विधानावर उपस्थितांनी कडकडून टाळ्या वाजवत दाद दिली.

राज ठाकरे यांनी काल पुण्यात आपण १ मे रोजी औरंगाबादेत सभा घेणार असल्याची घोषणा केली होती. यावर शिवसेनेकडून तिखट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील भाष्य केले.


Supriya Sule,Raj Thackeray
MNS : राज ठाकरेंच्या सभेला मैदान मिळाले, पण पोलिसांची परवानगी मिळणार का?

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या सभेला जास्त महत्व देऊ नये, मनोरंजन म्हणून त्याकडे पहावे, ते येतील भाषण करून निघून जातील, तुम्ही का ताण घेताय? तुमचे काम करा, असा सल्ला देखील सुळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. रोज तणावात राहण्यापेक्षा कधीतरी मनोरंजन देखील झाले पाहिजे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरे यांच्या सभेची खिल्ली उडवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com