Health Minister Rajesh Tope
Health Minister Rajesh Tope Sarkarnama
मराठवाडा

Rajesh Tope:कोरोना नियंत्रणात, मार्चमध्ये राज्यातील निर्बंध हटतील

सरकारनामा ब्युरो

जालना : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने घटते आहे, लसीकरणात देखील आपण आघाडी घेतली असून जवळपास ९३ टक्के लोकांना आपण पहिला डोस, तर ६८ टक्के नागरिकांना आपण दुसरा डोस दिलेला आहे. (Rajesh Tope) याशिवाय ५७ टक्के विद्यार्थ्यांना देखील आपण डोस देण्यात यशस्वी झालेलो आहोत.

त्यामुळे राज्यातील टास्क फोर्स, केंद्र सरकारने देखील निर्बंध हटवण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे. (Jalna) त्यामुळे मार्च महिन्यात राज्यातील निर्बंध हटवले जातील, असा विश्वास आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले. (Marathwada) जालना येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना टोपे यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली.

टोपे म्हणाले, राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. तिसऱ्या लाटेत दररोजच्या कोरोना रुग्णांची संख्या ही ४८ हजारांवर पोहचली होती. परंतु आता ती घटून दोन हजारांवर आली आहे. पुढील काळात ही संख्या आणखी कमी होईल आणि जे काही नियम, निर्बंध सध्या लागू आहेत, ते हटवण्याचा विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व टास्क फोर्स करत आहे.

कोरोना रुग्णांची घटती संख्या ही राज्याच्या दृष्टीने दिलासा देणारी बाब आहे. लसीकरणावर भर देतांनाच आपण अनेक निर्बंध लावून कोरोनाची तिसरी लाट रोखली असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे सध्या लागू असलेले निर्बंध मार्चमध्ये हटवण्याचा विचार राज्य सरकार करते आहे. टास्क फोर्सने देखील त्याला अनुकूलता दर्शवली आहे. मुख्यमंत्र्यांती देखील हीच भावना आहे.

या शिवाय केंद्र सरकारकडून राज्यांना जी पत्र पाठवली जात आहेत, त्यात देखील आपापल्या राज्यातील निर्बंध हटवण्या संदर्भात सुतोवाच करण्यात आले आहे. लसीकरणाचा पहिला, दुसरा डोस आणि विद्यार्थ्यांचे लसीकरण आपण वेगाने करत असल्याचा हा परिणाम आहे.

राज्य सध्या पुर्णपणे बंद नाही, पण काही बंधने आपण विवाह समारंभ, नाट्यगृह, थिएटर, उपहारगृह आदी ठिकाणी घातलेली आहेत. ती देखील मार्चमध्ये हटवली जातील, अशी मला अपेक्षा असल्याचे टोपे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT