Raju Shetti On Farmer Loan Waiver and Suicide sarkarnama
मराठवाडा

Raju Shetti : 'तुमची लायकी अन् औकात नव्हती तर कशाला..., हे ही अतिरेकीच'; शेतकरी आत्महत्यावरून राजू शेट्टींचे सरकारवर आसूड

Raju Shetti On Farmer Loan Waiver and Suicide : राज्यात एकीकडे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू असतानाही केंद्र सरकार असो की राज्य सरकार ते ठोस भूमीका घेताना दिसत नाही. यावरून आता विरोधक सरकारवर टीका करताना दिसत आहेत.

Aslam Shanedivan

Parbhani : राज्यात सत्तेत आलेल्या महायुती सरकारला अनेक घोषणा सत्यात आणता आलेल्या नाहीत. शेतकरी कर्जमाफीची घोषणाही हवेतच राहिली आहे. यामुळे विरोधकांनी अनेकदा सरकारवर जोरदार टीका केली आहे. दरम्यान परभणीच्या माळसोन्ना गावामध्ये सचिन आणि ज्योती जाधव या शेतकरी दांपत्याने कर्जापायी आत्महत्या केली. यामुळे दोन्ही मुलीच्या जगण्यामरण्यासह त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर आसूड ओढला आहे. त्यांनी 'तुमची लायकी अन् औकात नव्हती तर कशाला कर्जमाफीची घोषणा करता' असा संतप्त सवाल सरकारला विचारला आहे. ते येथे आक्रोश पदयात्रेच्या समारोपानंतर बोलत होते.

यावेळी राजू शेट्टी यांनी, काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. तसेच केंद्र सरकारने ज्या संशयित अतिरेक्यांच्या घरावर बुलडोझर चालवले, त्याबद्दल अभिनंदन केलं आहे. मात्र सरकारचे धोरण आणि कर्जमाफीची घोषणा करूनही ते पूर्ण न केल्यानेच राज्यात दररोज सात शेतकरी आत्महत्या करत आहेत. त्यामुळे हे सरकारदेखील अतिरेकीच आहे. त्यांनी कोण जाब विचाराणार? असा सवाल करताना, सरकार कर्जमाफी देत नसेल तर सरकारमधील मंत्र्यांचे दौरे होऊ देणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला आहे.

आता जाब विचारायचा...

यावेळी शेट्टी यांनी सरकारचे धोरणामुळेच शेतकरी आत्महत्या करत असल्याचा दावा केला असून शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना, आता मरायचं नाही तर जाब विचारा अशी विनंती केली आहे. तर जाब हा सरकारी धोरणाविरोधात विचारा. सरकारी धोरणामुळेच आज शेती कर्जबाजारी होत असून ते वाढत आहे. त्यातच शेतीतून येणारे उत्पन्न कमी होत आहे. यामुळे आता आता मरायचे नाही. तर सरकारी धोरणाविरोधात जाब विचारायची तयारी ठेवा असेही म्हटलं आहे.

दोन्ही मुलींची शिक्षणाची जबाबदारी

परभणीच्या माळसोन्ना गावामध्ये सचिन आणि ज्योती जाधव या शेतकरी दांपत्याने कर्जापायी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. यानंतर स्वाभिमानीचे प्रमुख राजू शेट्टी यांनी माळसोन्ना ते परभणी अशी आक्रोश पदयात्रा काढली. तर शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी त्यांनी, सचिन आणि ज्योती जाधव या शेतकरी दांपत्याच्या दोन्ही मुलींची शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याचे जाहीर केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT