Farmers Leader Raju Sheety
Farmers Leader Raju Sheety Sarkarnama
मराठवाडा

Raju Shetty On Sattar : त्या विधानबद्दल मुख्यमंत्र्यांनी सत्तारांना कान धरून जाब विचारावा..

सरकारनामा ब्युरो

Jalna : शेतकऱ्यांच्या आत्महत्या आजच्या नाहीत, कित्येक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतो आहे हे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे विधान संतापजनक आणि त्यांना शेतकऱ्यांबद्दल किती आपुलकी आहे हे दाखवणारेच आहे. खरंतर मुख्यमंत्र्यांनी सत्तारांचा कान धरून त्यांना या विधानाबद्दल जाब विचारला पाहिजे, अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केली.

जालना येथे माध्यमांशी बोलतांना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कार्यकाळातच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचा आरोप देखील केला. राजू शेट्टी म्हणाले, एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळात राज्यात सर्वाधीक शेतकरी आत्महत्या होत आहेत. किड्या, मुंग्यांसारखे शेतकरी मरत असताना यांना संवेदना नाहीत.

मुख्यमंत्र्यांनी सत्तारांचा कान धरून जाब विचारला पाहिजे. विरोधकांनी देखील कृषिमंत्री सत्तारांना विधानसभेत खडसावले पाहिजे.सत्तारांचं वक्तव्य संतापजनक असून सरकार शेतकऱ्यांच्या प्रति संवेदनशील नाही हे यावरून स्पष्ट होते.

स्वतःच्या मतदार संघात ३ तर जिल्ह्यात ७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊनही शेतकरी आत्महत्या हा जुना विषय आहे हे कृषिमंत्री सत्तार यांचं वक्तव्य अतिशय संतापजनक असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सत्तारांचा कान पकडून जाब विचारावा.

मी सत्तारांच्या वक्तव्याचा निषेध करतो. सत्तार यांच्या मतदार संघात गहू,भाजीपाला उत्पादक शेतकरी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीने टाहो फोडत असल्याचे देखील शेट्टी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT