Kisan Morcha News: शेतकऱ्यांच्या मागण्यांवर आजही तोडगा नाही; शिष्टमंडळासोबत होणारी बैठक पुढे ढकलली

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि किसान सभेचा मोर्चाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
Kisan Morcha
Kisan Morcha Sarkarnama

Kisan Morcha : राज्यसरकारने आमचा अंत पाहू नये, मुख्यमंत्र्यांसोबत आजच्या शेतकऱ्यांच्या बैठकीत जर तोडगा निघाला नाही, तर एकीकडे शेतकऱ्यांच्या मोर्चा विधानभवनावर धडकेल तर दुसरीकडे राज्यभर जन आंदोलन पेटेल, असा इशारा किसान सभेने दिला आहे.तसेच, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नाही, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. त्यामुळे हे आंदोलन पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि किसान सभेचा मोर्चाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कांद्याच्या भावाचा प्रश्न, वाढती महागाई, शेतकऱ्यांना वीज, कर्जमाफी, नैसर्गिक आपत्ती, सोयाबीन, कापूस, तूर व हरभरा पिकांचे भाव अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. नाशिकवरून मुंबईकडे निघालेलं लाल वादळ वेगाने मुंबईच्या दिशेने निघाले आहे.आज या मोर्चाचा आज तिसरा दिवस आहे.

Kisan Morcha
Thackeray vs Shinde : सत्तासंघर्षावर आज सुनावणी पुर्ण होणार? ; शिंदे गटाचे वकील हरिश साळवेंचा लागणार कस!

पण शेतकरी प्रश्नावर आजही तोडगा निघणार नसल्याची माहिती समोर आली आहे. कारण राज्य सरकारची आज शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक होणार होती. पण ती उद्या (१५ मार्च) ला होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी संबंधित खात्याचे मंत्री आणि सचिव यांच्यासोबत या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक होणार होती. मात्र, अचानक राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनीही संप पुकारल्याने शेतकऱ्यांची ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.

अवकाळी पाऊस, वाढती महागाई अशा एक ना अनेक प्रश्नासाठी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे.पाच वर्षानंतर मुंबईवर पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं लाल वादळ धडकणार आहे. ज्या मागण्यांसाठी पाच वर्षांपूवी शेतकऱ्यांनी पायी मुंबई गाठली होती. आताही त्याच मागण्यांसाठी शेतकरी नाशिक ते मुंबईत धडकणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com