Raju Shetti, Sharad Pawar Sarkarnama
मराठवाडा

Raju Shetty News : पावसात भिजत शेतकऱ्यांना न्याय देऊ म्हणणाऱ्यांची आश्वासने पाण्यात भिजली

Raju Shetty's criticism of Sharad Pawar in the third Aghadi meeting : भाषणाच्या सुरवातीलाच तिसऱ्या आघाडीचा नेता कोण ? या विरोधकांच्या प्रश्नाला शेट्टी यांनी सडेतोड उत्तर दिले. महायुती आणि महाविकास आघाडीत नेता कोण हे विचारले जात नाही. मग, परिवर्तन महाशक्ती ला का विचारताय ?

Jagdish Pansare

Raju Shetty Political News : राज्यातील शेतकरी, कामगार, मजूर, बेरोजगार तरूण यांना न्याय देण्यासाठी म्हणून महाविकास आघाडी अस्तित्वात आली होती. साताऱ्याच्या भर पावसात झालेल्या सभेत चिंब भिजलेल्या महाविकास आघाडीच्या शिल्पकारांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. पण सत्तेवर येताच त्यांची ही आश्वासने पाण्यात भिजली, विरघळली असा टोला शेतकरी संघटनेचे नेते तथा तिसऱ्या आघाडीचे संयोजक माजी खासदार राजू शेट्टी यांनी शरद पवारांना लगावला.

तिसऱ्या आघाडीचा नेता कोण? अस विचाणाऱ्यांनी कधी महाविकास आघाडी-महायुतीला तुमचा नेता कोण ? असे विचारले का? मग आम्हाला का विचारता? असा सवाल शेट्टी (Raju Sheeti) यांनी विरोधकांना विचारला. राज्यात आकारास आलेल्या तिसऱ्या आघाडीचा परिवर्तन महाशक्ती हा संयुक्त मेळावा आज संभाजीनगरमध्ये पार पडला. संभाजीराजे छत्रपती, आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थित झालेल्या मेळाव्यात राजू शेट्टी यांनी आपल्या भाषणात महायुती आणि महाविकास आघाडीवर आसूड ओढले.

भाषणाच्या सुरवातीलाच तिसऱ्या आघाडीचा नेता कोण ? या विरोधकांच्या प्रश्नाला शेट्टी यांनी सडेतोड उत्तर दिले. महायुती आणि महाविकास आघाडीत नेता कोण हे विचारले जात नाही. मग, परिवर्तन महाशक्ती ला का विचारताय ? आम्ही सर्वच नेते आहोत. चळवळीतीत पक्ष, संघटना, सामाजिक संघटना या परिवर्तन महाशक्ती मध्ये येत आहेत. आज सर्वाधिक बेरोजगारीची टक्केवारी आपल्या राज्यात आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोघांनाही याचे उत्तर द्यावे, लागेल.

आरक्षणाच्या मागणीसाठी वेगवेगळी आंदोलने सुरू आहेत. राज्यातील सामाजिक परिस्थिती महात्मा फुले यांच्या आसूड मधील वर्णनाप्रमाणे झाली आहे. राज्यात रोज अकरा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. या आत्महत्या सरकारी धोरणाचा परिणाम आहे, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला. (Sharad Pawar) कापुस, सोयाबीन, दुध, मका संबंधीच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी हवालदील झाला आहे. 3.65 कोटी असंघटित कामगारांची सरकार ठेकेदारांच्या माध्यमातून लुट करत आहे. त्याविरोधात ही परिवर्तन महाशक्ती आहे.

शेतमजुरासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन व्हायला पाहिजे, अशी मागमी शेट्टी यांनी यावेळी केली. शिक्षणाचे खाजगीकरण करून बाजारीकरण थांबले पाहीजे. शेतकऱ्यांसाठी म्हणून महाविकास आघाडी अस्तित्वात आली. साताऱ्यात भिजत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देवू सांगितले, पण ती आश्वासने पाण्यात भिजली. महाविकास आघाडीने शेतकऱ्यांचे वाटोळे केले. शेतकऱ्यांच्या जमिनी ओरबाडल्या जात आहेत, असा आरोप शेट्टी यांनी केला.

महायुती राज्यातील प्रकल्पांचा खर्च वाढते आहे. म्हणून मोबदला कमी केला जात आहे, समृद्धी महामार्ग झाले म्हणून आमदाराचा दर 50 कोटी झाला. महाशक्ती पीठ झाले तर आमदाराचा दर 100 कोटी होईल, असा टोला त्यांनी महायुती-महाविकास आघाडीला लगावला. युती-महाविकास आघाडीचे नेते अश्लील टिंगल टवाळी, पानउतारा करण्यात जनसामान्याचे प्रश्न विसरले आहेत.

त्यामुळे परिवर्तन महाशक्तीला ताकद द्या. राजकारण आमचा धंदा नाही. जाती धर्मावर आम्हाला मते मागायची नाहीत. आम्हाला वोट कटर म्हणून हिणवणाऱ्यांनी मग आम्ही शेतकऱ्यांचे कारखाने वाचवण्यासाठी उठवलेला आवाज भाजपने का दाबला, त्याचे भांडवल का केले ? ज्या नेत्यांवर आरोप केले तेच नेते भाजपमध्ये जावून पवित्र कसे झाले ? असा प्रश्न शेट्टी यांनी यावेळी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT