movement sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांच्यासाठी निघालेल्या रॅलीतील तरुणाला मारहाण, रस्त्यावर ठिय्या आंदोलन

Manoj Jarange Patil Rally young man Beating : मराठा समाजाचे आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची तब्येत चांगली राहावी तसेच त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी सिरसाळा व परळी येथील युवकांनी रविवारी सकाळी परळी-तुळजापूर पायी दिंडी यात्रा काढली.

Datta Deshmukh

Manoj Jarange Patil News: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी बीड जिल्ह्यातील परळी येथून तुळजापूरकडे निघालेल्या मराठा समाजातील युवकांच्या रॅलीतील एकास मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी या रॅलीतील मराठा युवक तसेच मराठा समाज बांधव या घटनेचा निषेध करीत परळी -आंबेजोगाई रस्त्यावरच ठिय्या मांडून बसले होते. या घटनेतील आरोपीस अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मराठा समाजाचे आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची तब्येत चांगली राहावी तसेच त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी सिरसाळा व परळी येथील युवकांनी रविवारी (ता.28) सकाळी परळी-तुळजापूर पायी दिंडी यात्रा काढली. हे युवक रॅलीद्वारे निघाले होते. ही रॅली शहरातील प्रमुख रस्त्यावरुन आंबेजोगाईकडे मार्गस्थ होत असताना वैद्यनाथ काॅलेज दरम्यान रॅलीतील एका युवकास मारहाण झाली.

मारहाणीच्या निषेधार्थ तसेच मारहाण करणाऱ्यांवर कारवाईसाठी रॅलीतील युवकांनी याच रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. या घटनेतील आरोपीस जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाहीत, असा पवित्रा युवकांनी घेतला होता.

दरम्यान कोणताही तणाव वाढू नये यासाठी घटनास्थळी पोलीसांनी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उशीरापर्यंत तरुणांचे ठिय्या आंदोलन सुरू होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते माधव जाधव, तालुका प्रमुख देवराव लुगडे, शिवसेना (शिंदे गट) तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, शहराध्यक्ष वैजनाथ माने यांच्यासह सकल मराठा समाजाचे युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT