Bjp News : विरोधकांकडून खोटा नरेटीव्ह कसा सेट केला जातो, याचा उद्या पर्दाफाश करणार; भाजपच्या बड्या नेत्याचा इशारा

Political News : विविध मुद्द्यावरून विरोधकांकडून राज्य सरकारला घेरले जात आहे. त्यातच आता विरोधकांकडून खोटा नरेटीव्ह कसा सेट केला जातो, याचा उद्या पर्दाफाश करणार असल्याची घोषणा करीत भाजपच्या बड्या नेत्याने इशारा दिला आहे.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागल्याने आता भाजपकडून ताकही फुंकून पिले जात आहे. लोकसभा निवडणुकीत का पराभव स्वीकरावा लागला याची कारणे शोधून उपाययोजना केली जात आहेत. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने त्यामध्ये फटका बसू नये, याची काळजी महायुतीकडून घेतली जात आहे. त्यामुळेच विरोधकांच्या नरेटीव्हला उत्तर देण्यासाठी दहा प्रवक्त्यांची नवी टीम भाजपने मैदानात उतरवली आहे.

राज्यातील राजकीय वातावरण मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलेच तापलेले दिसत आहे. विविध मुद्द्यावरून विरोधकांकडून राज्य सरकारला घेरले जात आहे. त्यातच आता विरोधकांकडून खोटा नरेटीव्ह कसा सेट केला जातो, याचा उद्या पर्दाफाश करणार असल्याची घोषणा करीत भाजपचे बडे नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी इशारा दिला आहे. (Bjp News)

राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. राजकीय बोलण्यापेक्षा मूळ प्रश्नांना बगल देण्यास सुरुवात केली आहे. फेक नरेटीव्ह कसा सेट केला जातो, त्याचा पर्दाफाश मी उद्या करणार आहे, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

सरकार आंदोलकांच्या भूमिकेशी सहमत आहे. पण ओबीसी कोट्यामधून आरक्षण द्या, या मागणीसोबत कुणीही राजकीय पक्ष सहमत नाही. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे का? याबाबत भूमिका स्पष्ट करावी. काँग्रेस, उद्धव ठाकरे किंवा मविआने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी मराठा नेते मनोज जरांगे यांनी करावी, असे आवाहन प्रवीण दरेकर यांनी केले.

BJP
Ambadas Danve News : अजितदादांच्या तोंड लपवून जाण्यावर अंबादास दानवेंनी केली खोचक टीका

त्यासोबतच आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारमध्ये कुठलीही दोन मते नाहीत. विरोधी पक्ष हा दोन्ही समाजाच्या बाजूने दिसत नाही. त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. जनतेची दिशाभूल थांबवली पाहिजे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली पाहिजे. सामाजिक तणाव आणि तेढ संपुष्टात आली पाहिजे, अशी भूमिकाही दरेकर यांनी मांडली.

त्यासोबतच आता सोमवारी पत्रकार परिषद घेत प्रवीण दरेकर विरोधकांकडून खोटा नरेटीव्ह कसा सेट केला जातो, याचा नेमका काय पर्दाफाश करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

BJP
Ajit Pawar News : महायुतीच्या जागावाटपाबाबत अजित पवारांचे मोठं विधान; म्हणाले,...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com