Ramdas Athawale Sarkarnama
मराठवाडा

Ramdas Athawale News : 'नव्वदच्या दशकात रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी योग्य भूमिका घेतली असती, तर आज आमचे ...; आठवलेंचं मोठं विधान

Marathwada Political News: गौर येथील तरुण संतोष सावळे हत्या प्रकरणाची सीआयडीमार्फत सखोल चौकशी व्हावी तसेच यातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : नव्वदच्या दशकात रिपब्लिकन पक्षाच्या इतर गटातील नेत्यांनी योग्य भूमिका निभावली असती तर आज आमचे वीस पेक्षा अधिक आमदार निवडून आले असते, असा दावा केंद्रीय मंत्री तथा आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला.

सर्व आंबेडकरी पक्षाचे ऐक्य व्हावे, ही आपली भूमिका असल्याचे सांगत त्यांनी पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना ऐक्याची हाक दिली. रिपब्लिकन पक्ष हा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील पक्ष असल्याचे आठवले म्हणाले.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजात अभूतपूर्व जागृती केली असून गरजू मराठ्यांना आरक्षण द्यावे, मात्र सरसकट मराठा आरक्षण देऊ नये, अशी भूमिका आठवले यांनी मांडली. पूर्णा तालुक्यातील गौर येथील सावळे कुटुंबीयांच्या सांत्वनपर भेटीसाठी ते परभणी जिल्हा दौऱ्यावर आले होते.

गौर येथील तरुण संतोष सावळे हत्या प्रकरणाची सीआयडीमार्फत सखोल चौकशी व्हावी तसेच यातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, परभणी शहरातील संविधान उद्देशिका विटंबना प्रकरणातील तरुणांवरील पोलीस प्रकरणे मागे घेण्याचे आवाहन आठवले यांनी राज्य सरकारला केले. यापूर्वी सरकारने नामांतर लढा, मराठा आरक्षण, मंडल आयोग आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्याचेही यावेळी आठवले म्हणाले.

काॅक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके हा बुद्धिमान तरुण असून त्याने योग्य प्रश्नावर आवाज उठवला आहे. सीजेपीने मागणी केलेल्या मंत्र्यांची केंद्र सरकारने हकालपट्टी केली असल्याने या आंदोलनाला यश आले, असल्याचे आठवले यांनी मान्य केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT