Congress News : रावसाहेब दानवेंना पुन्हा घरी बसवण्यासाठी काँग्रेसचा 'प्लॅन' ठरला : जालना जिल्ह्याच्या नव्या कार्यकारिणीतून संकेत

Jalna Politics: काँग्रेस पक्षाने जालना जिल्ह्याच्या कार्यकारिणीला नुकतीच मान्यता दिली आहे. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने या मतदारसंघात इतिहास घडवला. पाच टर्म खासदार राहिलेल्या भाजपाच्या रावसाहेब दानवे यांचा काँग्रेसच्या डाॅ. कल्याण काळे यांनी पराभव केला.
Kalyan Kale, Raosaheb Danve
Kalyan Kale, Raosaheb DanveSarkarnama
Published on
Updated on

Jalna Politics : काँग्रेस पक्षाने जालना जिल्ह्याच्या कार्यकारिणीला नुकतीच मान्यता दिली आहे. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने या मतदारसंघात इतिहास घडवला. पाच टर्म खासदार राहिलेल्या भाजपाच्या रावसाहेब दानवे यांचा काँग्रेसच्या डाॅ. कल्याण काळे यांनी पराभव केला.

नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीही काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले. या दोन्ही निवडणुकींमध्ये मुस्लिम मतदार काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिल्याचे दिसून आले. आगामी जालना जिल्हा परिषदेची निवडणूक आणि 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुका पाहता काँग्रेस पक्ष संघटनात्मक रचनेमध्ये मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व देत असल्याचे समोर आले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कार्यकारिणीमध्ये हेच चित्र दिसले होते. आता जालन्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये पन्नास टक्क्यांहून अधिक अल्पसंख्याक पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे कार्य व काँग्रेस पक्षाचे पुरोगामी विचार तळागळापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण भरीव कार्य कराल व काँग्रेस पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल, असा विश्वास त्यांनी या नियुक्तीला मान्यता देताना व्यक्त केला आहे.

Kalyan Kale, Raosaheb Danve
Yavatmal Dcc Bank : भाजपला दणका देण्याची तयारी; विरोधात सर्वपक्षीय पॅनेल टाकण्याची चाचपणी : जिल्हा बँक निवडणूक टप्प्यात येताच वाढल्या हालचाली

स्वातंत्र्यापासून काँग्रेस, जनता दल व काही प्रमाणात डाव्या पक्षांकडे झुकलेला मुस्लिम मतदार गेल्या दोन दशकांपासून काँग्रेसपासून दुरावला आहे. मुस्लिम वोट बँकेच्या जोरावरच राज्यात आणि देशात काँग्रेस आघाडीची सरकारे सत्तारुढ झाली होती. महाराष्ट्रात एमआयएम पक्षाचा शिरकाव झाल्यापासून काँग्रेसची मुस्लिम वोट बँक तिकडे झुकली आहे.

याचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना बसला. तर या मत विभाजनाचा सर्वाधिक लाभ हा भाजपाला मिळाला. 2014 ते 2024 या दहा वर्षात गेल्या लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळला तर काँग्रेस पक्षाला मुस्लिम मते फारसी मिळालीच नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपाला विरोध म्हणून मुस्लिम मतदारांनी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह काँग्रेसच्या महाविकास आघाडीला पसंती दर्शवली होती.

Kalyan Kale, Raosaheb Danve
Gokul news : गोकुळ बिनविरोधच्या बदल्यात सतेज पाटलांना विधानपरिषदेची आमदारकी? वाटाघाटीच्या चर्चांवर 'करेक्ट कार्यक्रमा'चे संकेत

महाविकास आघाडीला मुस्लिम मतदारांची साथ 2029 मध्ये कायम राहावी यासाठी जिल्हा, तालुका आणि राज्य पातळीवर मुस्लिमांचे प्रतिनिधित्व, संघटनेतील त्याचा वाटा वाढवण्यावर केंद्र आणि राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी भर दिला आहे. जालना जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकारिणीच्या यादीवर नजर टाकली तर ते दिसून येते.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मान्यता दिलेल्या कार्यकारिणीत पाच उपाध्यक्षांमध्ये चार पदे ही मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आली आहेत. सहा सरचिटणीसांची नेमणूक करण्यात आली आहे, यामध्ये पन्नास टक्के म्हणजे तीन हे अल्पसंख्याक समाजाचे आहेत. पक्षाच्या वतीने दहा सचिवांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, यामध्ये तब्बल सात पदे मुस्लिम चेहऱ्यांना देण्यात आले आहेत. सल्लागारांची दोन पदे आहेत, त्यापैकी एकावर मुस्लिम पदाधिकाऱ्याची वर्णी लावण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com