Ramdas Athawale Manoj Jarange meeting Sarkarnama
मराठवाडा

Ramdas Athawale Manoj Jarange Meeting : मंत्री रामदास आठवलेंचे जरांगे पाटलांशी गुप्तगू; मुंबईच्या आंदोलनावर ठाम

Union Minister Ramdas Athawale met Manoj Jarange at Antarwali Sarati in Jalna Maratha reservation demands and protests : अंतरवाली सराटीत इथं केंद्रीय मंत्री रामदास आठवले अन् मनोज जरांगे यांच्यात भेटीत जरांगेंनी मागण्यांचे निवेदन आठवले यांना दिले.

Jagdish Pansare

Jalna Antarwali Sarati news : केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीत इथं भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार पुकारला असून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ते मुंबईला आंदोलन निघणार आहे.

दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जरांगे पाटील यांना मागण्याचं निवेदन दिले. मंत्री आठवले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जरांगे पाटील यांच्या मागण्याविषयी चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले.

मंत्री आठवले आणि जरांगे पाटील या दोघांमध्ये अर्धातास काय चर्चा झाली, यावर वेगवेगळे तर्कविर्तक लढवले जात आहे. जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी आरपारची लढाई सुरू केली आहे. 29 ऑगस्टला ते मुंबईत (Mumbai) आंदोलन करणार असून, त्याच्या नियोजनासाठी आज अंतरवाली सराटी इथं मराठा बांधवांची बैठक झाली.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातून अनेक प्रश्न सुटले आहेत अजून बाकी असून ते सुटावेत त्यांची अपेक्षा आहे. मागील आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री इतर नेत्यांबरोबर मी सुद्धा इथं भेट देऊन चर्चा केली. राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले. परंतु जरांगे पाटील यांना शंका आहे, ते टिकेल की नाही, यावर मंत्री आठवले (Ramdas Athawale) यांनी भाष्य केले.

'कुणबी नोंदीच्या माध्यमातून काहींना आरक्षण मिळाले. परंतु अजूनही ज्यांच्या नोंदी सापडत नाही, त्यांच्यासाठी हैदराबाद, सातारा, बाम्बे संस्थानचे गॅझेट लागू करावं, यासाठी 29 आगस्टपर्यंत आम्हाला आरक्षण देण्याची जी मागणी केली आहे, ती मी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन भूमिका मांडणार असल्याचे मंत्री आठवले यांनी आश्वासन दिले.

मनोज जरांगे पाटील सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांचा लढा मोठा आहे. मंडळ आयोगाचं ओबीसी आरक्षण मिळाले होते. तेव्हा मी सुद्धा मागणी केली होती, मराठा समाजातील गोरगरीब मुलांना, शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आरक्षण द्या म्हणून. ही मागणी आपण प्रथम केल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT