
Ahilyanagar political updates : अहिल्यानगरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेच्या समर्थनात सभा झाली.
भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आम्ही संग्राम जगताप यांच्याबरोबर आहोत, असे सांगताना 'मी प्रखर बोलू शकत नाही. पण याबाबत मला संग्राम ओव्हरटेक करून गेला. मी त्याच्या मागे पाठीमागे धक्का द्यायला फूल सपोर्टमध्ये उभा आहे', असे सांगितले. सुजय विखे पाटलांचं संग्राम जगताप यांना हिंदुत्वाच्या मुद्यावरून दिलेलं पाठबळ म्हणजे, अजितदादांना महायुती एक सूचक संकेत असल्याची चर्चेने जोर धरला आहे.
सुजय विखे (Sujay Vikhe) पाटील म्हणाले, "मी प्रखर बोलू शकत नाही. पण ही जबाबदारी काहींनी मांडली. मला अजून त्या रुळाकडे यायला वेळ लागले. हळूहळू त्या मार्गाकडे आलो आहे. पण संग्राम मला ओव्हरटेक करून गेल्याने, मी त्याच्या मागे पाठीमागे धक्का द्यायला आहे".
'आज लोकांना त्रास याचा आहे की, हिंदू (Hindu) जागा झाला आहे. महिला आणि जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी हिंदू जागा झाला आहे, याचा त्रास या लोकांना आहे. लोकसभेच्या निवडणुकीतील व्होट जिहादींचं उत्तर विधानसभेत हिंदूंनी एकत्रित हिंदू आमदारांना निवडून दिल्याचा यांना त्रास होत आहे', असा घणाघात सुजय विखे पाटील यांनी केला.
'कोणताही भेदभाव नाही. कोणत्याही धर्माविरोधात आम्ही नाही. आम्ही हिंदूंच्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी एकत्रित आहोत. आपल्या गेलेल्या जमिनी परत घेण्यासाठी, हिंदूंची गेलेली मंदिर परत घेण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. लोकशाही असलेल्या देशात असं का? असा प्रश्न अनेक जण करतात. आम्ही सेक्यूलर होण्यास तयार आहोत. गो-हत्या बंदी करा, आम्ही सेक्यूलर होऊ. सेक्युलर एकतर्फा, असू शकत नाही', असेही सुजय विखे पाटील यांनी म्हटले.
'ज्या देशात अन् महाराष्ट्रात अबू आझमीला वारकऱ्यांविषयी बोलण्याची परवानगी आहे, त्याच महाराष्ट्रात संग्रामला देखील हिंदूंची बाजू मांडण्याची परवानगी आहे. लोकतंत्रमध्ये प्रक्रिया एका बाजूने पूर्ण केली जाऊ शकत नाही. लोकतंत्रमध्ये ओवैसीला, मी भारत माता की जय म्हणणार नाही, तेवढाच अधिकार अहिल्यानगरमधील प्रत्येक माणसाला 'जय श्रीराम', उघडपणे म्हणण्याचा आहे. असे हे सेक्युलिरिझम मी मान्य करेल. इतर सेक्युलिरिझम थोतांड आहे', असे सुजय विखे पाटील यांनी म्हटले.
हिंदूवर होणारा अन्यायामुळे, आज एकटवलेला समाजात संग्राम एकटा नव्हे. पण जो तो व्यक्ती हिंदू समाजाच्या रक्षणासाठी पुढे येईल, त्याला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला, किंवा त्याला कोणी टार्गेट करेल, त्याच्यावर दडपशाही कराल, तर महाराष्ट्रातील हिंदू सर्व जातीला विसरून एकटवलेला आहे. आम्ही प्रत्येकाच्या पाठिमागे खंबीरपणे उभा राहणार, असा संदेश महाराष्ट्रात अहिल्यानगरमधून गेल्याचे सुजय विखे पाटील यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.