Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी 20 वर्षांपासूनचं राजकीय शत्रुत्व संपवत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत राजकीय वातावरण तापवलं आहे. पण बेस्टच्या निवडणुकीला सामोरे गेलेल्या ठाकरे बंधूंना पराभवाला धक्का सहन करावा लागला. याच पराभवानंतर आता केंद्रीय मंत्र्यांनी ठाकरे बंधूंना फटकारलं आहे.
केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख नेते रामदास आठवले (Ramdas Athawale) हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी बेस्टच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या मनसेचे राज ठाकरे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला आहे. याचदरम्यान, धाराशिवमध्ये स्वबळाचा नारा दिला आहे.
धाराशिवच्या दौऱ्यावर आले असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बेस्टच्या निवडणुकीतील पराभवानंतर मोठं विधान केलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची झाली युती, मात्र बेस्टच्या निवडणुकीत झाली त्यांची माती,अशी खोचक टीका आठवले यांनी कवितेद्वारे केली आहे.
यावेळी मंत्री रामदास आठवले यांनी यावेळी महायुती म्हणून आगामी निवडणुका लढवाव्या अशी मागणी केली आहे. तसेच यात महायुतीत आरपीआयलाही सन्मानजनक जागा देण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी उचलून धरली.
रामदास आठवले यांनी यावेळी मुंबई महानगरपालिकाम निवडणुकीवर मोठं विधान केलं. ते म्हणाले, राज्यभरात आरपीआयची ताकद असून आम्हाला मुंबईत सन्मानजनक वाटा मिळावा अशी मागणीही त्यांनी केली. मुंबईत आरपीआयला 15 जागांची मागणी करताना योग्य वाटा मिळाला नाही तर आरपीआय स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचा इशाराही आठवलेंनी दिला.
रामदास आठवले यांची यावेळी धाराशिवमधील मराठा आंदोलकांनी भेट घेतली. यावेळी आंदोलकांनी मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी आठवले यांनी संसदेत भूमिका मांडावी अशी आग्रही मागणी त्यांनी लावून धरली.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मुंबईच्या दिशेनं काढण्यात येत असल्यानं मराठा आरक्षणाविषयीचा तोडगा काढण्यासाठी मंत्री रामदास आठवलेंनी आपली व पक्षाची भूमिका जाहीर करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी त्यांच्याकडे केली आहे. त्यावर याप्रकरणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ आणि त्यांना मराठा समाजाच्या मागण्यांविषयी अवगत करणार असल्याची प्रतिक्रियाही आठवले यांनी यावेळी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.