
Nitesh Rane taunts Aaditya Thackeray : मुंबईतील बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युती असलेल्या पॅनलचा पराभव झाला. या निवडणुकीत भाजप महायुतीला यश मिळालं नसलं, तरी ठाकरे बंधूंचा युती असलेल्या पॅनलचा पराभवाने अत्यंत आनंद जाला आहे.
भाजपचे नेते आणि मंत्री, ठाकरेंना वारंवार या निकालावरून डिवचत आहे. 'खजील' करत आहेत. भाजप मंत्री नीतेश राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांना जिव्हारी लागेल, असं डिवचलं आहे.
भाजप मंत्री नीतेश राणे यांनी सिंधुदुर्ग इथं आज पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मुंबईतील बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालावरून आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना डिवचलं. ते म्हणाले, "ट्रायल बॉलवर नापास झालास, तर मॅचमध्ये तेच होणार, महाराष्ट्रातील माणूस देवाभाऊ यांच्याबरोबर आहे."
BDD चाळमधील 556 सदनिकांच्या चाव्यांचं वितरण झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार यांच्या उपस्थित होणाऱ्या या कार्यक्रमाला युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले होते. तसं पत्रिकेवर नाव देखील होतं.
परंतु कार्यक्रमातील भाषणातून आदित्य ठाकरेंचं नाव वगळ्यात आल्यानं त्यांनी कार्यक्रमाला हजर राहण्याचं टाळलं. लाभार्थ्यांना पुठ्ठ्याच्या नको, तर खऱ्या चाव्या द्या, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला होता. त्यावर मंत्री नीतेश राणे यांनी, 'तुझ्या वडिलांनी काय केले ते सांग? आमचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील', असा टोला पत्रकार परिषदेतून लगावला.
शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी 'सामाना'तून अमित शाह यांच्यावर टीका केली. त्यावर मंत्री राणे म्हणाले, "उद्धव ठाकरेंनी कोणाला कसे गायब केले याची, माहिती आम्ही द्यायची का? दिशा सालियन केसमध्ये कसं कोणाला गायब केलं, याची माहिती संजय राऊत यांना द्यायची का? लोकांना गायब करण्यात उद्धव ठाकरेंची कशी 'पी. एचडी' आहे, याबद्दल थोडी माहिती द्यायची का? याबद्दल संजय राऊत यांचे थोबाड उघडणार नाही."
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही पाकिस्तान स्थित दहशतवादी तळांविरुद्ध भारतीय लष्कारानं आॅपरेशन सिंदूर राबवलं. पाकिस्ताननं या कारवाईवरून देशाविरुद्ध अप्रत्यक्षपणे युद्ध पुकारलं. यानंतर आता देशात पाकिस्तान खेळाडू येऊन क्रिकेट सामने खेळण्यावरून शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. आदित्य ठाकरे देखील आक्रमक झाले आहेत. त्यावरून मंत्री राणे यांनी, जुने संदर्भ काढून, याबाबत राहुलबाबाला विचार, 10 जनपथची परवानगी आण, असा टोमणा मारला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.