Ramdas Athwale-Uddhav Thackearay
Ramdas Athwale-Uddhav Thackearay Sarkarnama
मराठवाडा

Ramdas Athwale : महायुतीत या, अडीच वर्षाच्या फार्मुल्याचा विचार होऊ शकतो...

गणेश पांडे

परभणी : महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल आहे, कॉग्रेसचे आमदार नाराज आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी शिवसेनेने आता पुन्हा महायुतीत यावे. (Shivsena) अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या फाॅर्म्युल्याचा विचार होऊ शकतो, असे म्हणत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना महायुतीत येण्याचे निमंत्रण दिले.

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ते शनिवारी परभणीत पत्रकारांशी बोलत होतो. भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) च्या वतीने राज्यभऱात पक्ष संघटना बांधणी व कार्यकर्त्यांना जागृत करण्यासाठी पक्षाचे प्रमुख रामदास आठवले हे गाठीभेटी घेत आहेत. शनिवारी ते परभणी शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकाराशी बोलतांना शिवसेना - भाजप युती होण्याबाबत भाष्य केले.

ते म्हणाले, सध्या महाविकास आघाडीतील घटक पक्षात नाराजी दिसत आहे. कॉग्रेसच्या आमदारांचा मोठा गट नाराज आहे. समसमान निधी वाटपावरून हा गट नाराज असून तो कॉग्रेसच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना भेटणार आहे. यावरूनच कॉग्रेसच्या आमदारांची नाराजी स्पष्ट पणे दिसत आहे. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही. त्यामुळे लवकरच भाजप परत राज्यात सत्ता स्थापन करेल.

अजूनही अनेक निष्ठावंत शिवसैनिकाची भाजप सोबत जाण्याची इच्छा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी परत एकदा विचार करून महायुतीत यावे. अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्मुल्याचा विचार होऊ शकतो. केंद्रीय तपास यंत्रणांनी गेल्या काही दिवसात राज्यात केलेल्या कारवायावरही त्यांनी आपले मत व्यक्त केले.

या यंत्रणा कोणाच्या दबावाखाली काम करत नसतात. ज्याचे व्यवहार पारदर्शी नसतात, त्यांच्याच चौकश्या या यंत्रणा करत असतात. यात ठाकरे व पवार कुटूंबियांच्या निकटवर्तीवर झालेल्या कारवाया या द्वेषभावनेतून झालेल्या नाहीत. उलट ठाकरे व पवार कुटूंबिया बद्दल आम्हाल नेहमीच आदर असल्याचे आठवले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT