Ramgiri Maharaj 
मराठवाडा

Ramgiri Maharaj: "दुसरा गाल पुढे करुन मारा म्हणण्यासारखं नपुंसकत्व नाही"; रामगिरी महाराजांचं पुन्हा वादग्रस्त विधान; MIMला डिवचलं

Ramgiri Maharaj: धर्माला ग्लानी येते तेव्हा सत्तेचा वापर करून त्यावर मात केली पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

सरकारनामा ब्युरो

Ramgiri Maharaj: छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत एमएमआयएमनं चांगलीच मुसंडी मारली तर शिवसेनेची मोठी पिछेहाट झाली. भाजप इथं सर्वात मोठा पक्ष ठरला असून एमआयएम दुसऱ्या तर शिवसेना तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर रामगिरी महाराज यांनी एमआयएमबाबत पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे.

रामगिरी महाराज म्हणाले, "MIMचे अतिउन्मत्त लोकं आहेत. त्यांना वठणीवर आणण्याचं काम करावं लागेल. शहरातील काही भागात आपल्याला जाताही येतही नाही. इतर कोणीही पुजनीय नाही असं म्हणणाऱ्यांच्या विरोधात आपण आहोत. हिंदू धर्म सहिष्णू आहे मात्र नपुंसक नाही. मात्र, कोणी अन्याय करत असेल तर तो सहन करू नये हे शास्त्र सांगत. एका गालात मारली तर दुसऱ्या गालात मारून घ्या असं आपलं शास्त्र सांगत नाही. एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करून मारा असं म्हणण्यासारखं दुसरं नपुंसकत्वक नाही"

धर्म आपले रक्षण करतो तसंच आपलंही कर्तव्य आहे की, आपण धर्माचं रक्षण केलं पाहिजे. धर्माला जेव्हा ग्लानी येत असेल तेव्हा सत्तेचा वापर करून त्यावर मात केली पाहिजे. दृष्ट कृत्य करणारे मुघल, औरंगजेब स्वतःच्या बापाचा होऊ शकला नाही, तो दुसरा कोणाचा कसा होईल? अशा लोकांकडं सात्विकपणा कसा येईल, अशा उन्मत्त लोकांवर अंकुश ठेवला पाहिजे. अविवेकी माणसाच्या हातात सत्ता आली तर त्याचा दुरुपयोग करतो. ज्यांच्याकडं विवेकीपणा आहे त्यांच्याकडं आता सत्ता मिळाली आहे. रामाचा आदर्श आपण घेतला पाहिजे, अशा कठोर शब्दांत रामगिरी महाराज यांनी एमआयएमवर निशाणा साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT