Ankush Wagh
Ankush Wagh sarkarnama
मराठवाडा

फाटक्या कपड्यातला शिवसैनिकानं वेधलं लक्ष ; ठाकरे मुख्यमंत्री व्हावे, म्हणून सहा कोटी वेळा जप

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद: मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची काल औरंगाबाद येथे सभा झाली. या सभेत त्यांनी औरंगाबादचा पाणी प्रश्न, रस्ते, संभाजीनगर, भाजप, भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर भाष्य केलं, पण सभास्थळी फाटक्या कपड्यात आलेल्या एका शिवसैनिकाने सगळ्याचे लक्ष वेधून घेतलं. (CM Thackeray Rally Aurangabad)

आयुष्यात आपल्याला काहीतरी मिळवायचे असेल, काही इच्छा असेल, तर आपण देवाचं नामस्मरण करीत जप करतो, त्याचाच प्रत्यय बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेत आला.2019 विधानसभा निवडणुकीनंतर अनेक डावपेच आखले गेले.अनेक राजकीय घडामोडीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, पण उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे, यासाठी एक कट्टर शिवसैनिक २०१३ पासून रामनाम जप करीत होता.

जालना जिल्ह्यातील पांघरी येथील कट्टर शिवसैनिक अंकुश वाघ ( Shiv Sainik Ankush Wagh ) यांनी 2013 पासून रामनाम जप सुरू केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री ( CM Uddhav Thackeray ) व्हावे याकरिता त्याने चक्क 6 कोटी 75 लाख वेळा श्री रामाचे नामस्मरण ( 6 crore 75 lakh times Naming of Shri Ram ) करत वहीत नोंद केली आहे. सभा स्थळी फाटक्या कपड्यात आलेला या शिवसैनिकांने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

राम नामाचा जप करण्यासाठी विशेष वही असते. त्या वहीमध्ये त्यांनी रामाचे नामस्मरण लिहिण्यास सुरुवात केली. पाहता पाहता 6 कोटी 75 लाख वेळा रामाचे नाव त्यांनी लिहून काढले.पाच कोटींचा प्रण होता. मात्र उद्धव ठाकरे कायम मुख्यमंत्री राहावे, म्हणून नामस्मरण सुरू ठेवले असून ते कायम सुरू राहील, असे शिवसैनिक अंकुश वाघ यांनी सांगितले आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर वाघ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण कोरोनामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. "मुंबईत जाऊन दोन वेळा परत आलो होतो. मात्र आता मुख्यमंत्री स्वतः सभेसाठी मराठवाड्यात आले आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी आमदार अंबादास दानवे यांनी वाघ यांना बोलावले. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाली. रामाचे नामस्मरण लिहिलेल्या वह्या त्यांच्याकडे दिल्या आहे. उद्धव ठाकरे अयोध्येला जातील त्यावेळी यांच्या हस्ते या वह्या प्रभु श्री रामाच्या चरणी जाव्यात, अशी इच्छा अंकुश वाघ यांनी यावेळी व्यक्त केली. वाघ यांच्या यावेळी मुख्यमंत्र्यांचा हस्त सत्कार करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT