Raosaheb Danve Advise Babanrao Lonikar News Jalna Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve News : 'बबनराव आता थांबा, मुलाला पुढे करा' रावसाहेब दानवे यांचा लोणीकरांना सल्ला!

Raosaheb Danve On MLA Babanrao Lonikar : 'आता तुम्ही थांबा, राहुल लोणीकरला पुढे करा. तुमच्यासाठी परभणी लोकसभा मतदारसंघ खुला आहे. माझा तुम्हाला संपूर्ण पाठिंबा असेल.

Jagdish Pansare

  1. चाळीस वर्षांनंतर रावसाहेब दानवे परतूरमध्ये गेले आणि त्यांनी बबनराव लोणीकरांशी महत्त्वपूर्ण राजकीय चर्चा केली.

  2. दानवेंनी लोणीकरांना विधानसभा सोडून परभणी लोकसभा निवडणुकीत उतरावे असा स्पष्ट सल्ला दिला.

  3. या वक्तव्यामुळे परभणी आणि जालना-परतूर परिसरातील भाजपच्या आगामी निवडणूक रणनीतीचा नवा संकेत मिळाल्याचे समजते.

Jalna Politics : राजकारणात कायम एकमेकांना पाण्यात पाहणारे दोन नेते आज परस्परांची स्तुती करताना दिसले. एकाच पक्षात आणि बहुदा एकाच वेळी राजकारणाला सुरुवात करणाऱ्या जालन्यातील भाजप मधील माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि परतूरचे विद्यमान आमदार तथा माजीमंत्री बबनराव लोणीकर यांच्यातील दिलजमाईची चर्चा राज्यभरात होताना दिसते आहे.चाळीस वर्षानंतर लोणीकरांच्या परतुरमध्ये पाय ठेवल्यानंतर रावसाहेब दानवे यांची गाडी सुसाट सुटली.

आपल्या मिश्किल आणि ग्रामीण शैलीतील भाषणासाठी प्रसिद्ध असलेल्या दानवे यांनी लोणीकर यांना थांबण्याचा आणि मुलाला पुढे करण्याचा सल्लाही दिला. बबनराव लोणीकर यांनी यापूर्वी केलेल्या विधानसभा निवडणूक न लढवण्याच्या विधानाचा धागा पकडत रावसाहेब दानवे यांनी लोणीकरांवर मिश्किल टिप्पणी केली. 'बबनराव तुम्ही आठवेळा विधानसभा निवडणुका लढलात. एक निवडणूक म्हणजे एक बाळंतपण असतं, तुमची आठ बाळांतपण झाली पण एकही टाका तुम्हाला लागला नाही' असा चिमटा लोणीकरांना काढला.

'आता तुम्ही थांबा, राहुल लोणीकरला पुढे करा. तुमच्यासाठी परभणी लोकसभा मतदारसंघ खुला आहे. माझा तुम्हाला संपूर्ण पाठिंबा असेल, जे तुमच्या विरोधात असतील त्यांनाही एकत्र घेऊ आणि तुमचे काम करू, असा शब्द मी आजच तुम्हाला देतो' अशी ग्वाही रावसाहेब दानवे यांनी लोणीकरांना दिली. लोकसभेच्या निवडणुका या मुदतीपेक्षा सहा महिने आधी होणार असल्याचे सांगत रावसाहेब दानवे यांनी तीन वर्षाचा काळ आत्ता संपेल. तेव्हा आतापासूनच तयारीला लागा, असेही बबनराव लोणीकरांना सुचवले.

हरिभाऊ बागडे यांनी विधानसभा निवडणूक लढणार नाही, असे जाहीर केल्यानंतर पक्षाने त्यांना राज्यपाल केले. तुम्हीही विधानसभा लढणार नाही, असे जाहीर केले आहे. त्यामुळे तुमच्या बाबतीत असा काही निर्णय झाला तर आमच्याकडे लक्ष असू द्या, असा टोलाही रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणातून लगावला. 40 वर्षानंतर परतुरमध्ये दाखल झालेल्या रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर यांनी आपल्यातील वाद आता मिटले आहेत याची खात्री उपस्थितांना दिली.

एवढेच नाही तर बबनराव लोणीकर तुम्हीही भोकरदनमध्ये या. लोकांना आपल्यातील वाद मिटले याची खात्री पटली पाहिजे, असे म्हणत आमंत्रण दिले. त्यानुसार उद्या बबनराव लोणीकर हे भोकरदनमध्ये जाणार आहेत. एकूणच रावसाहेब दानवे यांच्या परतुर दौऱ्याने दानवे- लोणीकर यांचे सूर तर जुळलेच परंतु या युतीने जालना जिल्ह्यातील राजकारणालाही कलाटणी दिली आहे.

FAQs

1. रावसाहेब दानवे परतूरमध्ये का गेले होते?

दीर्घ काळानंतर झालेल्या भेटीत त्यांनी स्थानिक नेत्यांशी राजकीय चर्चा व संपर्क साधला.

2. दानवेंनी लोणीकरांना कोणता सल्ला दिला?

विधानसभा न लढता परभणी लोकसभेत उतरावे, असा मोठा राजकीय सल्ला दिला.

3. या वक्तव्याचा राजकीय अर्थ काय लावला जातो?

भाजप परभणीमध्ये मजबूत उमेदवार शोधत असून लोणीकरांना ती मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे.

4. लोणीकरांचा परभणीशी काय संबंध आहे?

ते या परिसरात प्रभावी नेते असून त्याचा परतूर विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभेत येतो, त्यांचे नेटवर्क मजबूत मानले जाते.

5. या वक्तव्यामुळे स्थानिक राजकारणावर काय परिणाम होईल?

परभणी लोकसभेच्या उमेदवारीवर नवे समीकरण तयार होऊ शकते आणि भाजपचा अंतर्गत संतुलन बदलू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT