Newly Elected Sarpanch News, Aurangabad
Newly Elected Sarpanch News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला तोंडावर आपटले

नवनाथ इधाटे

Marathwada News : राज्यभरात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाला मोठे यश मिळाले असून जनतेने भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटाच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत सर्वाधिक (Bjp) भाजपचे सदस्य निवडून आले आहेत. या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला तोंडावर आपटले, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. फुलंब्री येथे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

तालुक्यातील १८ पैकी १३ ग्रामपंचायतीचे सरपंच हे भाजपचे असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. (Raosaheb Danve) दानवे म्हणाले की, (Grampanchayat Election) ग्रामपंचायतच्या निवडणुकीत राज्यातील जनतेने भाजपला कौल दिला. राजकारण बदलत चालले असल्यामुळे त्यानुसार कार्यकर्त्यांनीही आपल्यामध्ये बदल केला पाहिजे. केंद्रातल्या सगळ्या मंत्र्यांकडे चार लोकसभेची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

येणारी दोन वर्षे निवडणुकीची असणार आहेत, या वर्षांमध्ये बाजार समिती, नगरपंचायत, नगरपरिषदा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, लोकसभा आणि विधानसभा या निवडणुका होणार आहे. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीकडे लक्ष दिले पाहिजे. निवडून आलेल्या पदाधिकाऱ्याकडे जनतेचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे आपण त्याप्रमाणे काम करायला हवे.

ज्या मतदाराने आपल्याला मतदान केले ते तर आपले आहेच पण जे आपल्याला मिळाले नाही अशा माणसांना आपल्या कार्यकर्त्यांनी जोडले पाहिजे. महिला पदाधिकारीही सक्षम असून चांगले काम करीत असल्याचेही दानवे म्हणाले. तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी दोन्ही बाजूने भाजपचेच पॅनल असल्याने या ठिकाणी भाजपचा एक गट जिंकला आणि भाजपचाच दुसरा गट हारला.

त्यामुळे इतर पक्षाला अशा गावात भाजपने थांबवलं. अशा गावांमध्ये भाजप जिंकलं आणि भाजपच हरलं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे निवडून येणाऱ्यांनी आणि पराभूत होणाऱ्यांनी राजकीय मतभेद विसरून प्रत्येक गोष्टीत विरोध करण्याची वृत्ती सोडावी. गावच्या विकासात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार हरिभाऊ बागडे यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT