Arjun Khotkar : गोरंट्याल म्हणजे गटार गंगा, आता त्यांची प्रकरणं बाहेर काढतो..

Marathwada : त्यांचे तोंड म्हणजे गटार गंगा आहे, त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या, मला त्यांचे नाव घेण्याची देखील इच्छा नाही.
Mla Kailas Gorantyal-Arjun Khotkar News, Aurangabad
Mla Kailas Gorantyal-Arjun Khotkar News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

Jalna News : काॅंग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी शिंदे गटाचे उपनेते तथा माजी आमदार अर्जून खोतकर यांच्यावर टीका करतांना तुम्ही फाटक्या कपड्यावर सायकलवर फिरत होतात, आज तुम्ही जे काही आहात ते ठाकरे घराण्यामुळे, असा टोला लगावला होता. यावर आता (Arjun Khotkar)अर्जून खोतकर यांनी गोरंट्याल यांच्यावर पलटवार केला आहे.

Mla Kailas Gorantyal-Arjun Khotkar News, Aurangabad
Cm Eknath Shinde : देव, देश अन् धर्म या त्रिसुत्रीवर चालणारे हे आपले सरकार..

गोरंट्याल म्हणजे गटार गंगा आहे, त्यांचे नाव घेऊन मी माझे तोंड का खराब करून घेऊ? आता नगरपालिका, (jalna) नगराध्यक्ष आणि त्यांची प्रकरणे बाहेर काढतो, अशी धमकी देखील खोतकर यांनी दिली. (Kailas Gorantyal) गोरंट्याल यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देतांना खोतकर म्हणाले, मी काय होतो हे मला माहित आहे, त्यांनी सांगायची गरज नाही, मी जन्मताच तीनशे एकर शेतीचा मालक होतो.

त्यामुळे गोरंट्याल यांनी मला शिकवण्याची गरज नाही. त्यांचे तोंड म्हणजे गटार गंगा आहे, त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या, मला त्यांचे नाव घेण्याची देखील इच्छा नाही. नगरपालिका, नगराध्यक्षांची प्रकरणे मी आता बाहेर काढतो, असेही खोतकर म्हणाले.

राज्यातील सत्तातंरानंतर शिंदे यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांमध्ये अर्जून खोतकर यांचा देखील समावेश आहे. शिवसेनेने सगळे काही दिलेले असतांना खोतकरांनी गद्दारी केल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केला होता. तुम्ही फाटलेली कपडे घालून सायकलवरून फिरत होता.

तुम्ही आज ज्या ठिकाणी पोचलात, ते फक्त उद्धव ठाकरे यांच्या घराण्यामुळे, हे लक्षात ठेवा. पण, त्यांनाच धोका देऊन तुम्ही पार्टी सोडून जाता? तुम्हाला शरम, लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत गोरंट्याल यांनी खोतकर यांच्यावर हल्लाबोल केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com